लोणी काळभोर परिसरात अवैध वाळू वाहतूक उघडपणे सुरू! पोलीस चौकीसमोरूनच गाड्यांची वर्दळ ; प्रशासन मूकदर्शक?
लोणी काळभोर परिसरात अवैध वाळू वाहतूक जोमात!

लोणी काळभोर (ता. हवेली) : लोणी काळभोर परिसरात अवैध वाळू वाहतूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आश्चर्य म्हणजे ही वाहतूक थेट पोलीस चौकीसमोरूनच उघडपणे सुरू आहे. २५ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे १२:०४ वाजता वाळूने भरलेल्या गाड्यांची सर्रास ये-जा होत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकरणात स्थानिक तलाठी, मंडलाधिकारी यांचे नियंत्रण नसल्याचे सुत्रांच्या माहितीने कळत आहे.
कायद्याचे भय संपले का?
स्थानिक नागरिकांनी याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कायद्याचे भय संपल्यामुळेच वाळू माफियांना एवढे बळ आले आहे का, या अवैध वाहतूक कोणाच्या वरद हस्ताने चालू आहे. याची सखोल चौकशी करावी असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. विशेष म्हणजे, अवैध वाळू वाहतूकीस थेट प्रशासन मूकदर्शक का ?
तहसील प्रशासनाची भूमिका…
या संदर्भात अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले, की “प्रकरणाची तपासणी करून आवश्यक ती चौकशी केली जाईल. नियमबाह्य वाळू वाहतूक थांबविण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, वारंवार मिळणाऱ्या आश्वासनांवर आता नागरिकांचा विश्वास कमी होत चालला असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा चालू आह.
नागरिकांचा संताप – प्रश्नांची मालिका…
नागरिकांमध्ये रोषाची लाट उसळली असून त्यांचा सवाल आहे –
—या अवैध वाळू वाहतुकीला पाठबळ कोणाचे आहे?
—कोणाच्या वरदहस्तामुळे वाळू माफियांची गाड्या पोलिस ठाण्याच्या समोरून बिनधास्त धावत आहेत?
—प्रशासन खरंच गंभीर आहे का? की मूक संमती देत आहे?
पर्यावरणाचा मोठा प्रश्न…
अवैध वाळू वाहतूक कोठून होत आहे. अवैध वाळू वाहतूक होत आहे याचा अर्थ अवैध उत्खनन सुरू आहे. ज्या ठिकाणी अवैध उत्खनन होत आहे. त्या ठिकाणी नैसर्गिक पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून, पाण्याचा प्रवाह बदलतो, भूजलस्तर घसरतो, तसेच परिसंस्थेवर गंभीर परिणाम होतात. या गंभीर समस्येकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
निष्कर्ष…
लोणी काळभोर परिसरात सुरू असलेल्या या बेकायदेशीर वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष होत राहिल्यास येत्या काळात मोठे पर्यावरणीय व सामाजिक संकट ओढवू शकते. प्रशासन कोणावर गंडांतर घालते आणि या वाळू माफियांना लगाम घालते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Editer sunil thorat



