
संपादक डॉ. गजानन टिंगरे
आनंदनगर (ता. इंदापूर, जि. पुणे) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज २ ऑक्टोबर रोजी ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगण्यात आले की, कलिंगाचे युद्ध नऊ दिवस चालले आणि दहाव्या दिवशी सम्राट अशोकाने शस्त्र खाली ठेवत शांती, अहिंसा, प्रेम, दया या मूलतत्त्वांनी युक्त असा “बौद्ध धर्म” स्वीकारला. स्वतःवर विजय मिळवल्याने या दिवसाला “विजयादशमी” असे म्हणतात. याच दिवशी सम्राट अशोकाने मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धम्माचा प्रसार करण्यासाठी जगभर पाठवले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव गौतम बुद्ध आणि बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. प्रतिमापूजनाची संधी स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव सुरेश काका कापडी, आनंदनगर ग्रामपंचायतचे सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे व्हॉइस चेअरमन रोहित दादा मोहोळकर, जंक्शन गावचे लघुउद्योजक रामेश्वर तात्या माने आणि आनंदघन सोसायटीचे नूतन सचिव उदय देशमुख यांना लाभली.
या प्रसंगी कुंडलिक सोनवणे यांनी सामूहिक धम्मवंदना सादर केली. कार्यक्रमात मेजर गोविंद कांबळे (वंचित बहुजन आघाडी), एडवोकेट विकास पवार, राजेंद्र जाधव सर, अविनाश कसबे (माजी वन अधिकारी), संतोष कांबळे (बहुजन समाज पार्टी), हनुमंत कांबळे, शिवाजी तुपे तसेच अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजक –
डॉ. संजीव लोंढे (सदस्य, पंचायत समिती इंदापूर)
संतोष तुकाराम कांबळे (कोषाध्यक्ष, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, महाराष्ट्र राज्य)
Editer sunil thorat




