जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

शेवाळवाडी व परिसरात शिवसेना-राजे क्लबतर्फे गणपती सजावट स्पर्धा ; विजेत्यांचा गौरव संपन्न…

मांजरी बु, केशवनगर, सडेसतरानळी व शेवाळवाडी परिसरात गणपती सजावट स्पर्धा उत्साहात...

शेवाळेवाडी (ता. हडपसर) : गणेशोत्सवानिमित्त शिवसेना व राजे क्लब ट्रस्ट शेवाळवाडी यांच्या वतीने मांजरी बु, केशवनगर, सडेसतरानळी व शेवाळवाडी परिसरातील नागरिक व मंडळांसाठी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. घरगुती गणपती सजावट, मंडळाचा गणपती सजावट व माझा गणपती इंस्टाग्राम रील या विविध विभागांत ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला परिसरातील नागरिक व तरुणाईकडून प्रचंड प्रतिसाद लाभला.

मंडळ गणपती सजावट स्पर्धा…

मंडळ गणपती सजावट स्पर्धेमध्ये कल्पतरू सेरेनिटी सोसायटीने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी ऑपरेशन सिंदूर व S-400 हवाई संरक्षण प्रणालीचा देखावा साकारला होता. शिवशंभो मित्र मंडळ, शेवाळवाडी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला तर बाळ गणेश मित्र मंडळ, भंडलकर नगर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

घरगुती गणपती सजावट स्पर्धा…

घरगुती गणपती सजावट स्पर्धेत नेहा ढिलेसुरज ढिले यांनी सुंदर देखाव्यासह प्रथम क्रमांक पटकावला. अविनाशविलास नाईकदिनेश कुलकर्णी (मांजरी) यांनी द्वितीय क्रमांक मिळविला तर हर्षदा कुंभारकरयोगेश राठोड यांना तृतीय क्रमांक मिळाला.

माझा गणपती इंस्टाग्राम रील स्पर्धा…

सोशल मीडियाच्या युगाला अनुसरून आयोजित केलेल्या माझा गणपती इंस्टाग्राम रील स्पर्धेत खुशी सचिन शेवाळेचैत्राली, सायली गायकवाड या त्रिकुटाने प्रथम क्रमांक पटकावला. समृद्धी नाकाडेओजस पिंपळकर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.

बक्षीस वितरण समारंभ…

या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. प्रत्येक विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह राजे क्लबच्या सदस्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या स्पर्धांमुळे परिसरातील नागरिक व तरुणांना आपली कलात्मकता व कल्पकता दाखविण्याची उत्तम संधी मिळाली. “आपल्या परिसरातील नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा व आपल्या सणाचा आनंद द्विगुणित व्हावा या हेतूने आपण या स्पर्धांचे आयोजन केले होते,” असे शिवसेना नेते व शेवाळवाडी गावचे माजी उपसरपंच अमीत पवार यांनी सांगितले.

शिवसेनाराजे क्लब यांच्या वतीने नेहमीच अशा प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन होत असल्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??