जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

शिंदवणे येथे राजे उमाजी नाईक, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे भव्य आयोजन…

उरुळी कांचन (ता. हवेली) : अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट आणि आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, शिंदवणे यांच्या संयुक्त विद्यमाने राजे उमाजी नाईक, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचा भव्य सोहळा हवेली तालुक्यातील शिंदवणे येथे मोठ्या उत्साहात व थाटात पार पडला.

या जयंती उत्सवाचे हे दुसरे वर्ष असून, सकाळी भव्य मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व समाज घटकांनी महिलाव नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

मान्यवरांचा सहभाग आणि सन्मान…

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश महाडिक (माजी सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष, शिंदवणे) यांनी विराजमान होऊन कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. समाजसेवेत मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांना ‘सेवारत्न पुरस्कार’ आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान राणी भंडलकर, महिला जिल्हा अध्यक्ष अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे जिल्हा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मारुती (आबा) तुपे यांना समाजरत्न गौरव पुरस्कार, शंकरराव मनोहर पाटील (पोलीस निरीक्षक, उरुळी कांचन) यांना जनसेवा रत्न पुरस्कार, देण्यात येणार आहे.

तसेच संजय भालेराव (माजी चेअरमन, लोणी काळभोर वि.का. सो.), यांना विशेष सन्मान करण्यात आला. प्रविण हेलगे (हडपसर विधानसभा प्रमुख), सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब बडेकर, बाळासाहेब झरांडे आणि दीपक मोरे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी समाजातील एकता, शिक्षण, महिलांचे सबलीकरण आणि इतिहास जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

संजय भालेराव यांनी आपल्या प्रभावी मनोगतात म्हटले की,

“ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नसतो, त्या समाजाचे भविष्य अंधकारमय होते.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि राजे उमाजी नाईक यांच्या विचारांचे अनुसरण करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने क्रांती करणे होय. शिवरायांनी ‘कलम’ हा शब्द न्यायासाठी वापरला आणि बाबासाहेबांनी तोच न्याय संविधानाद्वारे प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवला.” तसेच, त्यांनी राणी भंडलकर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना महिलांना समाजातील नेतृत्वात स्थान मिळावे, ही अपेक्षा व्यक्त केली.

प्रमुख आयोजक राणी भंडलकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,

“आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भंडलकर यांच्या मार्गदर्शनातून आम्ही समाज upliftment साठी प्रयत्नशील आहोत. अठरा पगड बारा बलुतेदार या संस्थेचा उद्देशच आहे. सर्व समाज, सर्व जाती-धर्म एकत्र येऊन सामाजिक ऐक्य आणि समतेचा संदेश देणे.” तसेच राणी भंडलकर यांनी गणेश महाडिक माजी सरपंच / विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष यांचे विशेष आभार मानले आणि पूरग्रस्तांसाठी त्यांनी दिलेल्या मदतीचा उल्लेख करत सर्वांना एकोप्याने कार्य करण्याचे आवाहन केले.

 

अध्यक्षस्थानी असलेल्या माजी सरपंच गणेश महाडिक यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हटले, “शिंदवणे ग्रामस्थांच्या एकतेने आणि राणी भंडलकर यांच्या पुढाकाराने हा उत्सव खऱ्या अर्थाने समाजजागृतीचा सोहळा ठरला आहे.
इतिहास बदलणारी माणसं आपल्यातून निर्माण झाली पाहिजेत. विचारांची श्रीमंती हीच खरी ताकद आहे.”

आयोजक व कार्यकर्त्यांचे योगदान…

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भंडलकर यांचे मार्गदर्शन लाभले. सदस्य दत्ताशेठ सूर्यवंशी, राहुलकाका भोडे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष समीरभाई मुलाणी, प्रसिद्धी प्रमुख शामराव जगताप, पुरंदर तालुका सचिव दिलीप गुरव,
जेजुरी शहर महिला अध्यक्ष मयुरी झरांडे, उपाध्यक्षा दीपाली कुंभार, सचिव योगिता मोरे, सरचिटणीस शलाका मोरे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब झरांडेदीपक मोरे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन प्राध्यापक भाऊसाहेब शिंदे यांनी केले.

कार्यक्रमाचा समारोप…

सत्कारमूर्तींच्या भोजन समारंभानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. एकतेचा, समाजसेवेचा आणि विचारांचा संदेश देणारा हा उत्सव ‘जय भीम, जय शिवराय, जय राजे उमाजी नाईक, जय महाराष्ट्र!’ अशा घोषणांनी गाजला.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??