लॉ कॉलेज रोडवर दुचाकीची धडक झाल्यानंतर वाद वाढला ; डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
क्राइम ब्रांचच्या हवालदारावर दोन अनोळखी इसमांची काठीने मारहाण...

पुणे : डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री सुमारास झालेल्या घटनेत क्राइम ब्रांच युनिट क्रमांक ३ मध्ये कार्यरत असलेल्या पोलीस हवालदारावर दोन अनोळखी इसमांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री अंदाजे १.०० वाजण्याच्या सुमारास लॉ कॉलेज रोडवरील ILS लॉ कॉलेजसमोर ही घटना घडली. दुचाकीच्या धडकेवरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर तीव्र हाणामारीत झाले. या वादात संबंधित दोन अनोळखी इसमांनी लाकडी काठीने पोलीस हवालदार अमोल काटकर (नेमणूक – क्राइम ब्रांच युनिट ३) यांना मारहाण करून जखमी केले.
जखमी काटकर यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
या प्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक १६५/२०२५ असा नोंदविण्यात आला आहे. संबंधित इसमांविरुद्ध भारतीय दंड संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३१४, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची प्राथमिक माहिती गोळा केली असून, दोन्ही अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे लॉ कॉलेज रोड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास डेक्कन पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
Editer sunil thorat



