क्राईम न्युजजिल्हा

कदमवाकवस्ती परिसरात पुन्हा अपघात ; पादचारी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर…

कदमवाकवस्ती परिसरात डंपरची धडक ; रस्त्यावर चालत असलेला तरुण गंभीर जखमी...

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : पुणे–सोलापूर महामार्गावर मंगळवारी (दि.7) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास भरधाव डंपरने पायी चाललेल्या तरुणाला जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. हा अपघात कदमवाकवस्ती हद्दीतील एचपी डेपो गेटसमोर घडला. जखमी तरुणाचे नाव जसवंत चौधरी (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) असे असून तो राजस्थानचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. चौधरी हा कदमवाकवस्ती परिसरात एका कंपनीत काम करत होता. नेहमीप्रमाणे कामावर जात असताना महामार्ग ओलांडताना भरधाव वेगातील डंपरने त्याला उडवले. या धडकेत तो गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदत करून जखमीला रुग्णालयात दाखल केले. वाहतूक पोलिसांनी राजस्थानमधील त्याच्या नातेवाईकांना अपघाताबाबत कळवले असून डंपर आणि चालकाला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे काही वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन डंपर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

 ‘स्थानिकांचा संताप, पादचारी पुलाची गरज आणि डंपरवरील कारवाई आवश्यक’…

कदमवाकवस्ती परिसरात गेल्या काही महिन्यांत अपघातांच्या घटना वाढल्या असून पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पुलाची तातडीने गरज व्यक्त केली आहे. तसेच, परिसरात भरधाव डंपर आणि अवैध वाळू–मुरुम वाहतुकीचा सुळसुळाट झाल्याची स्थानिकांकडून तक्रार आहे. दिवसा सर्रास आणि रात्री उशिरा या वाहनांची धडधड सुरू असते, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की “अवैध डंपर वाहतुकीवर नेमकी कारवाई कधी होणार? आणि रोजच्या अपघातांचा अंत कधी होणार?”

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??