
हडपसर (पुणे) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे उदघाटन सामाजिक कार्यकर्त्या सोनाली अजिंक्य घुले यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी सोनाली घुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले,
“पुस्तके ही माणसाचा खरा मार्गदर्शक आहेत. आयुष्याच्या कठीण परिस्थितीत पुस्तकेच साथ देतात आणि जगण्यासाठी आधार देतात. पुस्तकातील पान किंवा वाक्य एखाद्या व्यक्तीचे आयुष्य बदलू शकते. लहानपणापासून वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे, कारण एकदा वाचनाची आवड निर्माण झाली की ती आयुष्यभर टिकते. एपीजे अब्दुल कलाम यांचा उदहारण समोर आहे, गरीब परिस्थितीत वाढून ते राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले.”
व्याख्यानमालेचे पहिले सत्र डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी ‘आजची तरुणाई आणि सोशल मीडिया’ या विषयावर सादर केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या विळख्यात अडकून वेळ वाया न घालवता, खडतर अभ्यास करून स्वतःचं वैयक्तिक आणि सर्जनशील स्टेटस निर्माण करण्याचे आवाहन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी बहि:शाल शिक्षण मंडळाला “बिनभिंतीची शाळा” ठरवून अभ्यासक्रमाबाहेरील जीवनानुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व सांगितले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग करावा, असेही सुचवले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. गजाला सय्यद, प्रा. अनिल जगताप, प्रा. संद्याराणी गावडे, केंद्र कार्यवाह डॉ. नाना झगडे, प्रा. जयश्री अकोलकर, प्रा. व्ही. व्ही. शिंदे, प्रा. व्ही. पी. वाघमारे, प्रा. एस. ए. मीर, प्रा. अर्चना जाधव, प्रा. मनीषा पंडित, प्रा. व्ही. व्ही. खळदकर, प्रा. एस. डी. घारे, प्रा. पी. एन. डोंगरे, प्रा. एस. जे. भुजबळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस. ए. मीर, पाहुण्यांचा परिचय प्रा. अर्चना जाधव, सूत्रसंचालन प्रा. मनीषा पंडित, आभार प्रा. व्ही. व्ही. खळदकर यांनी मानले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केंद्र कार्यवाह डॉ. नाना झगडे यांनी केले.
Editer Sunil thorat





