जिल्हासामाजिक

दि. पूना डिस्ट्रिक्ट पोलीस क्रेडिट सोसायटीला राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार…

पुणे : स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या दि. पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे-११ या नामवंत संस्थेला, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे आयोजित “राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार २०२४-२५” प्रथम क्रमांकाने प्राप्त झाला आहे.

ही सोसायटी २० जून १९२० रोजी स्थापन झाली असून यावर्षी संस्थेने १०५ वर्षांचा उल्लेखनीय प्रवास पूर्ण केला आहे. संस्थेचे सुमारे १५,००० पोलीस अधिकारी व अंमलदार सभासद असून भागभांडवल तब्बल रु. ४१०.११ कोटी आहे.

कर्नाटकातील गोकर्ण महाबळेश्वर येथे १२ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील सहकारी पतसंस्था सहभागी झाल्या होत्या. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात मुदतठेवी, कर्ज वितरण आणि भागभांडवलात लक्षणीय वाढ तसेच १०० टक्के डिजिटलायझेशन करून सभासदांना तत्पर व आधुनिक सेवा पुरवल्याबद्दल पूना पोलीस सोसायटीची राज्यस्तरीय पातळीवर निवड करण्यात आली.

हा पुरस्कार सोसायटीच्या वतीने अध्यक्ष उदयकुमार काळभोर आणि माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सागर घोरपडे यांनी स्वीकारला.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्रभाकर कोरे (सांसद, कर्नाटक), अण्णासाहेब जोले (सांसद, चिक्कोडी), संजय होसमठ (संचालक, कर्नाटक फेडरेशन), काकासाहेब कोयटे (अध्यक्ष, महाराष्ट्र फेडरेशन), राहुल बोंद्रे (माजी आमदार, चिखली) आणि चंद्रशेखर सी.एस. (अध्यक्ष, कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन) आदी मान्यवर उपस्थित होते.

संस्थेच्या योजना व उपक्रम…

कर्ज योजना :

सर्वसाधारण कर्ज मर्यादा ₹२१ लाख, व्याजदर ९.४०%

तातडी कर्ज ₹१ लाख, व्याजदर ९.४०%

गृह व तारण कर्ज ₹५० लाख मर्यादा, व्याजदर ९.८०%

संस्थेची आर्थिक प्रगती :

संस्थेचे एकूण भागभांडवल व ठेवी ₹४१० कोटी ११ लाख, मुदतठेवी ₹८२.४६ कोटी, वार्षिक उलाढाल ₹३२८२ कोटी, आणि वितरित कर्ज ₹९४९.१३ कोटी इतके आहे.

सामाजिक व शैक्षणिक उपक्रम :

सभासद गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे, टॅब व लॅपटॉप वाटप.

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-अंमलदारांचा सत्कार व भेटवस्तू.

सभासदांना ₹२० लाख अपघात सुरक्षा कवच विमा.

मोफत आरोग्य शिबिरे व पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण सुविधा.

सभासदांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांना ₹२५,००० मयत निधी व कर्जमाफी.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर :

संस्था पूर्णपणे सीबीएस ऑनलाईन प्रणालीवर कार्यरत असून सभासदांसाठी मोबाइल अॅप, टोल-फ्री क्रमांक (१८०० ५७१ ५०६०), तसेच IMPS, NEFT, RTGS, Google Pay/PhonePe/Qr Code सुविधा उपलब्ध आहेत.

गौरवपूर्ण मानांकन :

संस्थेस ISO 9001:2015 मानांकन, सातत्याने ऑडिट ‘A’ वर्ग, आणि “BBB Stable” पतमानांकन प्राप्त आहे.

संस्थेचे ध्येय…

सभासद पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या आर्थिक प्रगतीसोबत सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी कार्य करणे हेच संस्थेचे प्रमुख ध्येय असल्याचे अध्यक्ष उदयकुमार काळभोर यांनी सांगितले.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??