
हडपसर (पुणे) : ब्रिजखालील व्यापाऱ्यांवर मनपाचे वेगवेगळे मापदंड लागू असल्याने छोट्या व्यवसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “नियम सगळ्यांसाठी एकच असायला हवा, पण येथे एका व्यापाऱ्याला सूट आणि इतरांवर कारवाई असा अन्याय सुरू आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक व्यावसायिकांनी दिली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ब्रिजखाली एकाच व्यापाऱ्याने चार-पाच खाटा लावून संपूर्ण जागा व्यापलेली आहे. त्यामुळे इतर लहान व्यवसायिकांना जागा न मिळाल्याने ते ब्रिजच्या आजूबाजूला दुकान लावतात. मात्र त्यावर मनपा अधिकारी तातडीने कारवाई करतात, दंड ठोठावतात आणि दुकानं हटवतात.
“एका व्यापाऱ्याने जास्त जागा व्यापली आहे हे अधिकारी पाहत नाहीत का? ती जागा थोडी कमी करून इतरांना दिली, तर सगळ्यांचा प्रश्न सुटेल,” अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे.
व्यवसायिकांचा आरोप आहे की, हिंदूंचे सण आले कीच मनपा अधिकारी जागे होतात आणि गोरगरीब हिंदू व्यावसायिकांवर कारवाई सुरू करतात. “सणाच्या काळातच अडथळा दिसतो का? रोजीरोटी चालवणाऱ्यांवर अन्याय का?” असा सवाल व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.
स्थानिकांनी मनपाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व व्यापाऱ्यांवर एकसमान नियम लागू करण्याची मागणी केली आहे.
या अन्याय कारक कारवाईमुळे गोरगरीब व्यवसायिक ऐन दिवाळीच्या सणावर अंधारमय दिवाळी साजरा करण्याची शक्यता यांच्या या कारवाईवर दिवाळी दिपमय करण्यासाठी कोण पुढे येत आहे ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Editer sunil thorat



