
लोणी काळभोर (ता. हवेली) : जनतेच्या हितासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाभावाचा सन्मान करण्याच्या हेतूने भारतीय जनता पक्षाच्या वतीने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर परिसरातील विविध सरकारी आस्थापनांमध्ये ‘दिवे’ भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
ही भेट नामदार चंद्रकांत पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, संसदीय कार्यमंत्री, पालकमंत्री सांगली व आमदार कोथरूड विधानसभा मतदारसंघ) तसेच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश व भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या वतीने देण्यात आली.
भाजपाच्या या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत लोणी काळभोर येथील सर्व कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (एमएसईबी) चे अधिकारी व कर्मचारी, पाटबंधारे विभाग लोणी काळभोर, तहसील कार्यालय हवेली लोणी काळभोर, तसेच वन विभाग लोणी काळभोर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावली निमित्त ‘दिवे’ भेट देण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे दिवाळी या हिंदू परंपरेतील उजेडाच्या आणि आनंदाच्या सणाद्वारे समाजात सेवा देणाऱ्या शासकीय यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा होता.
या भेटीद्वारे भारतीय जनता पक्षाने या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करत “अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या सेवकांचा सन्मान” अशी भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी हवेली मंडळाचे अध्यक्ष गणेश चौधरी, सरचिटणीस कमलेश काळभोर, उपाध्यक्ष पैलवान मनोज काळभोर व नामदेव जवळकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष तानाजी आप्पा काळभोर, उद्योग आघाडी अध्यक्ष नबाजी रुपनर, उद्योग आघाडी उपाध्यक्ष विनायक बळप, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष सतीश खंडेलवाल, सोशल मीडिया अध्यक्ष प्रशांत भोंडवे, कामगार आघाडी अध्यक्ष विशाल काळभोर, तसेच प्रगतशील बागायतदार प्रशांत वसंत काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी उपस्थित असलेल्या व स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला. असे सरचिटणीस हवेली भाजपाचे कमलेश काळभोर यांनी सांगितले की,
“जनतेच्या हितासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. समाजात सेवाभाव टिकवून ठेवणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.”
Editer sunil thorat






