जिल्हासामाजिक

रिक्षाचालक मोहन चंदनशिवे यांचे मानुसकीदर्शन ; प्रवाशाचा विसरलेला लॅपटॉप परत करत केले प्रेरणादायी कार्य…

लोणी काळभोर (पुणे) : प्रामाणिकपणा आणि मानुसकीचे दर्शन घडवणारी एक हृदयस्पर्शी घटना लोणी काळभोर परिसरात घडली आहे. रिक्षाचालक मोहन गणपती चंदनशिवे यांनी प्रवाशाने विसरलेला लॅपटॉप परत करत एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला असून समाजात त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

१५ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी सुमारे ७.१५ वाजता एम.आय.टी. कॉर्नर येथून एम.आय.टी. कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्थ किशोर पिंपरे (रा. एम.आय.टी. कॉलेज हॉस्टेल, लोणी काळभोर) हे बकोरी फाटा, वाघोली येथे जाण्यासाठी एम.एच. १२ टीयू ०८२२ क्रमांकाच्या रिक्षामध्ये बसले. प्रवास संपल्यावर ते बकोरी फाट्यावर उतरले, परंतु घाईगडबडीत त्यांनी आपली लॅपटॉप बॅग रिक्षामध्येच विसरली.

थोड्याच वेळात त्यांना ही गोष्ट लक्षात आली, मात्र रिक्षा क्रमांक माहित नसल्याने ते काहीही करू शकले नाहीत. त्यानंतर अर्थ पिंपरे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी तत्काळ तपास पथक तयार करून सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पो.शि. राहुल कर्डीले आणि पो.शि. प्रशांत सुतार यांना एम.आय.टी. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले.

दरम्यान, रिक्षाचालक मोहन चंदनशिवे यांनी प्रवाशाने विसरलेली बॅग रिक्षामध्ये सापडल्यानंतर मानवी संवेदनांचा परिचय देत स्वतः अर्थ पिंपरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी गुगल पे व्यवहारातील ट्रान्झक्शन आयडीच्या माध्यमातून मित्राच्या मदतीने अर्थ पिंपरे यांचा मोबाईल नंबर आणि इन्स्टाग्राम अकाउंट शोधले व संपर्क साधून लॅपटॉपसह बॅग परत केली.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांना बोलावून अधिक माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी या प्रामाणिक वर्तणुकीबद्दल मोहन चंदनशिवे यांचा विशेष सत्कार केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सांगितले की, “रिक्षाचालक मोहन चंदनशिवे यांनी दाखवलेले प्रामाणिकपण आणि मानुसकीचे उदाहरण हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.”

धुमाळमळा, थेऊर फाटा (ता. हवेली, जि. पुणे) येथील रहिवासी असलेले मोहन चंदनशिवे हे रिक्षा चालक म्हणून आपला उपजीविकेचा व्यवसाय करतात. पण त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकतेमुळे समाजात मानुसकी अजून जिवंत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??