
डॉ गजानन टिंगरे संपादक
लासुर्णे (ता.इंदापूर): वर्षातील सर्व सणांमध्ये विशेष महत्त्व असलेला आनंदाचा आणि प्रकाशाचा दिवाळी सण साजरा करताना भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष गजानन वाकसे व पदाधिकाऱ्यांकडून आशा स्वयंसेविकांना गोड फराळ, साडी व पंत्यांचे संच देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
कोरोना महामारीच्या काळात आणि त्यानंतरही आरोग्य जनजागृतीचे कार्य मनापासून करणाऱ्या आशा ताईंनी समाजाप्रती दाखविलेल्या सेवाभावाची दखल घेत हा उपक्रम राबविण्यात आला.
हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, युवा आमदार राहूल कुल, प्रदेश महामंत्री राजेश पांडे आणि जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाचे आयोजन लासुर्णे आरोग्यकेंद्रात करण्यात आले होते. यावेळी डॉ. लब्धी शहा (आरोग्य अधिकारी), औषध निर्माण अधिकारी अमोल पवार, सुपरवायझर गौरी चव्हाण, तसेच पांडुरंग सुळ, राहुल ननवरे, सुरज रासकर, दिपक रूपनर, सहदेव सरगर, देविदास बोराटे, सिकंदर मुलानी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि परिसरातील आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
या उपक्रमामुळे आशा स्वयंसेविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. दिवाळीच्या मंगलमय वातावरणात समाजसेवेचा हा सुंदर उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरला आहे.
Editer sunil thorat



