समर्पण वृद्धाश्रमात दीपावली फराळ वाटप, समाजसेवेचा खरा दीप प्रज्वलित ; डॉ. लक्ष्मण मासाळ…

पुणे : हडपसर येथील “समर्पण ओल्ड एज होम” येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साह, आपुलकी आणि आनंदाच्या वातावरणात दीपावली फराळ वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे वृद्धाश्रमात सणासुदीचा उत्साह आणि समाजसेवेचा सच्चा सुगंध दरवळला.
या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे लोणी पोलीस स्टेशनचे एपीआय सोमनाथ नाळे व रमेश वेठेकर (डीवायएसपी), होते. त्यांच्यासमवेत सुशील महाराज काळभोर, दिलीप सावणे (सहकार पत्रकार संघ अध्यक्ष), बाबासाहेब गायकवाड (महाराष्ट्र प्रदेश दलित पँथर उपाध्यक्ष), राजेंद्र कांबळे, तनाजी तापकिरे, विनायक भस्मारे, आज्जू सर, उत्तम सुतार, रनीताई खांदवे (महाराष्ट्र पोलीस), सागर जगदाळे (महाराष्ट्र पोलीस), राज्य मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्यकारिणी वरिष्ठ सदस्य सुनील थोरात, दुर्गाताई मगर, डॉ. नितीन वीर, चंद्रकांतदादा पवार, नितीन बेद्रे, कुमार बेद्रे आणि नितीन भांडवलकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
प्रास्ताविकात सोमनाथ पुणेकर यांनी सांगितले की, लक्ष्मण मसाळ यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या सामर्पण वृद्धाश्रमात सध्या ४१ आजी-आजोबांची सेवा केली जाते. येथे राहणाऱ्या प्रत्येक वृद्धासाठी भोजन, आरोग्य तपासणी, डॉक्टरांची नियमित भेट, फिजिओथेरपी, योगा आणि मनोरंजन अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
मुख्य पाहुणे एपीआय सोमनाथ नाळे म्हणाले…
“अशा प्रकारे वयोवृद्धांचे संगोपन करणे ही खरी देवसेवा आहे. लक्ष्मण मासाळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.”
डीवायएसपी रमेश वेठेकर यांनी ज्ञानेश्वरांच्या विचारांचा उल्लेख करत सामर्पणच्या सातत्यपूर्ण समाजसेवेचे कौतुक केले. तसेच दिलीप सावणे व दुर्गाताई मगर यांनी संस्थेला आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर महेश कुळपे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सोमनाथ पुणेकर यांनी केले.
या प्रसंगी राजेंद्र कांबळ (कार्याध्यक्ष, सामर्पण ओल्ड एज होम) यांची महाराष्ट्र पत्रकार संघ उपाध्यक्ष पदी व सुनील थोरात यांची राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारिणी सदस्य वरिष्ठ पदी निवड झाल्याबद्दल सामर्पण व शिवनेरी फाऊंडेशन तर्फे संविधानाच्या फोटो फ्रेमद्वारे सन्मान करण्यात आला.
या स्नेहमेळाव्याने सामर्पण वृद्धाश्रमात आनंद, आपुलकी आणि सणासुदीचा प्रकाश उजळला, जिथे फराळासोबत समाजसेवेचा खरा दीप प्रज्वलित झाला!
Editer sunil thorat










