
शेवाळेवाडी (हडपसर) : श्री शंभूराजे सांस्कृतिक व क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित तेराव्या दिवाळी पहाट संगीत महोत्सवा‘ चा सुरेल कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सुरांच्या मैफलीचा नागरिकांनी भल्या पहाटे मनसोक्त आनंद लुटला.
कार्यक्रमाचे उद्घाटन थाटामाटात झाले. यावेळी सुरेश घुले, दिलीप घुले, संदीप लोणकर, बाळासाहेब घुले, शिवाजी खलसे, राहुल तुपे, आबासाहेब शिंगोटे, भूषण तुपे, संदीप तुपे, राजेंद्र साळवे, बालाजी अंकुशराव, गजेंद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक डॉ. संजय गरुड यांनी अभंगवाणीने कार्यक्रमाची सुरुवात केली. “मदनाचा पुतळा राजस सुकुमार”, “अवचिता परिमळू झुळकला मळूमळू”, “भाग्यदा लक्ष्मी बारम्मा”, “जोहार मायबाप जोहार”, “कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात”, “विठ्ठलाच्या पायी थरारली वीट” अशी एकाहून एक भक्तिरसाने ओथंबलेली गीते सादर करून त्यांनी रसिकांना भक्तीरसात चिंब केले.
भूपाळीपासून भैरवीपर्यंत चाललेल्या या सुरेल मैफलीत पहाटेच्या वातावरणात सूर, ताल आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल शेवाळे व माजी सरपंच प्रतिमा राहुल शेवाळे यांनी केले. यावेळी प्रतिष्ठानचे संचालक विलास शेवाळे, विजय कोद्रे, सुनील शेवाळे, संभाजी हाके, राजेंद्र घुले, मंगेश शेवाळे, प्रीतम शेवाळे, चंद्रकांत शेवाळे, राम खेडेकर, शाम खवले, विलास भागवत, दिनेश भंडारी, उमेश सावंत, विजय खंडागळे, भारती शेवाळे, राधिका शेवाळे, रेखा शेवाळे, माधुरी मोरे, वैशाली हरपळे, मनीषा कोदरे, रसिका कुंभारकर, रोहित शेवाळे आदी उपस्थित होते.
भल्या पहाटेपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संगीत महोत्सवाचा आनंद घेतला.
Editer sunil thorat



