बीट मार्शल विजय ढाकणे यांची उत्कृष्ट कामगिरी, आत्महत्या करणार्याचा वाचवला जीव..; गोपाळपट्टी संपूर्ण घटना क्रम पहा व्हिडिओ..

पुणे (हडपसर) : (दि.१) या तारखेला रात्री मांजरी बुद्रुक (गोपाळपट्टी) येथील भारत सावंत यांचा पोलीस स्टेशनला फोन खणखणला तात्काळ सुत्र हलली.
झाले असे (दि.१) तारखेला भारत सावंत यांचा पोलीस कंट्रोल ला कॉल आला. आणि हा फोन गोपाळपट्टी येथुन आल्याचे समजताच बीट मार्शल विजय ढाकणे तात्काळ गोपाळपट्टी कॉल, पॉईंटला / घटनास्थळी पोहोचले.
झाले असे (दि.१) तारखेला भारत सावंत यांचा पोलीस कंट्रोलला कॉल केला. आणि हा फोन गोपाळपट्टी येथुन आल्याचे समजताच बीट मार्शल विजय ढाकणे तात्काळ गोपाळपट्टी कॉल पॉईंटला / घटनास्थळी पोहोचले. असता कॉलर यांनी सांगितले की त्यांच्या बहिणीचा दीर दारू पिऊन त्यांच्या बहिणीला त्रास देत होता. या बाचाबाचीत अनिकेत विटकर याने गळफास घेण्याची धमकी देऊन रूम मध्ये जाऊन रूम बंद करून घेतली आहे. बीट मार्शल विजय ढाकणे यांनी तात्काळ रूमचा दरवाजा तोडला. असता पोलीस स्टेशनला कळविलेल्या इसमाच्या बहिणीच्या दिराने घरातील सिलिंग फॅनला गळफास घेतलेला होता व ते तडफडत होते. विजय ढाकणे यांनी तात्काळ उचलून धरले. सहकारी यांनी ओढणी कापून गळफास घेण्याचा प्रयत्न करणारे अनिकेत विटकर यास खाली उतरवून रिक्षाने साई स्पंदन हॉस्पिटल (हडपसर) या ठिकाणी घेऊन गेले. असता त्यांनी सांगितले की पेशंटला सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन जा कॉलरचे बहिणीचे दीर अनिकेत विटकर यांना सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट केले.
त्यांच्यावर पुढील उपचार चालू आहेत. सदर ठिकाणी कॉलर आहेत त्यांनी नातेवाईकांना कळविलेले असुन मांजरी बीट मार्शल असणारे अंमलदार pc विजय ढाकणे मेजर, पांढऱ्या जॅकेट मध्ये आहेत यांनी ही मोलाची कामगिरी केली या कामगिरीने परिसरात बीट मार्शल विजय ढाकणे यांचे कौतुक होत आहे. या कामगिरने पोलीस खात्याची मान नक्कीच उंचावली.



