जिल्हाराजकीयसामाजिक

काशी–अयोध्या यात्रेतून पै. किरण साकोरे यांचा जनतेवर ठसा ; हजारो भाविकांसह भव्य रेल्वे प्रस्थान!

प्रदिप विद्याधर कंद : “जनतेच्या आशीर्वादाने किरण साकोरे यांची राजकीय स्वप्ने पूर्ण होतील”...

पुणे (हवेली) ; सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या तरुणाने हजारो भाविकांना काशी विश्वनाथ व अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी घेऊन जाणे, ही एक अद्वितीय व ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. सेवाभावी वृत्ती असलेल्या पै. किरण साकोरे यांना लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेचा उदंड आशीर्वाद लाभेल आणि त्यांच्या राजकीय स्वप्नांना जनता जनार्दन नक्कीच यश देईल, असा विश्वास पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पिडीसीसी बँकेचे संचालक व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद यांनी व्यक्त केला.

हडपसर रेल्वे स्थानकावरून काशी–अयोध्येकडे भव्य रेल्वे प्रस्थान!

‘प्रदिपदादा कंद युवा मंच’ व ‘पै. किरण साकोरे मित्र परिवार’ यांच्या वतीने आयोजित काशी विश्वनाथ–अयोध्या मोफत देवदर्शन यात्रेची पहिली रेल्वे दिनांक ५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता पुणे–हडपसर रेल्वे स्थानकावरून जय श्रीराम! हर हर महादेव!! घोषणांच्या गजरात रवाना झाली.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पिडीसीसी बँकेचे संचालक व भाजप जिल्हाध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद यांच्या हस्ते पूजन करून हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

या यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमास लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटाचे दावेदार व उमेदवार पै. किरण साकोरे, पुणे हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रविंद्र कंद, हवेली पंचायत समितीच्या माजी उपसभापती संजीवनी कापरे, माजी सरपंच मंदाकिनी साकोरे, तसेच गटातील आजी–माजी सरपंच, उपसरपंच, संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, मायबाप जनता, यात्रेकरू, प्रदिपदादा कंद युवा मंचचे कार्यकर्ते आणि पै. किरण साकोरे मित्र परिवाराचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयोजनात जिल्ह्यातील मान्यवरांचे मार्गदर्शन…

या भव्य यात्रेचे आयोजन शिरूर–हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पिडीसीसी बँकेचे संचालक व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पै. संदीप भोंडवे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप, हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाळके, पुणे हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व संचालक रविंद्र कंद, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर भुमकर आणि हवेली पंचायत समितीच्या माजी उपसभापती संजीवनी कापरे तसेच इतर ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

भाविकांसाठी सुयोग्य व्यवस्था – मोफत सेवा, वैद्यकीय पथक, अल्पोपहार व्यवस्था…

या मोफत देवदर्शन यात्रेच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी लोणीकंद–पेरणे गटातील प्रत्येक गावातील भाविकांसाठी हडपसर रेल्वे स्थानकापर्यंत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. रेल्वे स्थानकावर यात्रेकरूंना अल्पोपहार, प्रवासासाठी आवश्यक वस्तू, वैद्यकीय पथक आणि स्वयंसेवकांची साथ अशा सर्व सोयीसुविधा देण्यात आल्या. यात्रेकरूंच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक दिवस-रात्र कार्यरत होते.

जयघोषात दुमदुमले हडपसर रेल्वे स्थानक!

हडपसर रेल्वे स्थानकावर तुतारीच्या ललकारीत, हलगीच्या ठेक्यात, ताशा–ढोलाच्या कडकडाटात जय श्रीराम! हर हर महादेव!! अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. वारकरी भजनी मंडळींच्या “जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा” अशा भक्तिगीतांनी वातावरण पवित्र झाले. तर तरुणींनी सादर केलेल्या “रडू नको बाळा मी पाण्याला जाते” या गवळणीच्या गायनाने वातावरण आणखी मंगलमय झाले. भाविकांचे अनोखे स्वागत करण्यात आले आणि यात्रेकरूंमध्ये अपार आनंद आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले.

“काशी विश्वेश्वर आणि प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने विकासाची गंगा लोणीकंद–पेरणे गटात आणणार” — पै. किरण साकोरे

भक्ती, समर्पण आणि सामाजिक एकतेचा हा सोहळा लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील हजारो भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.
यावेळी बोलताना पै. किरण साकोरे म्हणाले,
“जनता जनार्दन रुपी मायबापांच्या आशीर्वादाने माझे स्वप्न पूर्ण होत आहे. काशी विश्वेश्वर आणि प्रभू श्रीरामांच्या कृपेने विकासाची गंगा लोणीकंद–पेरणे गटात आणणार आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, “ही यात्रा केवळ लोणीकंद–पेरणेपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण हवेली तालुक्यात श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश पोहोचवणारी ठरली आहे.”

Editer Sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??