क्राईम न्युज

जन्मदात्या आईनेच १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एका ३५ वर्षीय इसमाचा अत्याचार, अत्याचारातून मुलगी गर्भवती, गुन्हा दाखल…

                                      फोटो – सोशल मीडिया

पुणे (हवेली) : जन्मदात्या आईनेच आपल्या १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एका ३५ वर्षीय वाहन चालकाला अत्याचार करायला लावून त्याच्यासोबत बालविवाह करुन दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या अत्याचारातून मुलगी गर्भवती राहिल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या ३५ वर्षिय आईसह व मधुकर यशवंत गायकवाड (वय ३५ , रा. सुगाव, ता. देगलूर, जिल्हा नांदेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार कुंजीरवाडी परिसरात डिसेंबर २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत वेळोवेळी घडली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर अल्पवयीन मुलगी ही आपल्या लहान बहीण व भाऊ व आईसमवेत कुंजीरवाडी परिसरात राहत होती. मधुकर गायकवाड हा त्यांच्या घरातच राहत होता. त्यामुळे दोघीही त्याला ओळखत होत्या. डिसेंबर २०२४ मध्ये एके दिवशी (तारीख व वार माहिती नाही) रात्री मधुकर गायकवाड याने लहान बहीण व भावाला सिंधी पाजली. पीडितेने आईला याबाबत सांगीतले होते. परंतु आई काहीच बोलली नाही. पीडिता झोपल्यानंतर मधुकर हा तिच्याजवळ आला. त्याने तिला स्वयंपाक घरात नेवुन तिचे सर्व कपडे काढुन बलात्कार केला. याबाबत पीडितेने आईला सांगितले असता, आईने त्याला काय करायच ते करू दे असे म्हणुन झोपी गेली.

त्यानंतरही त्याने तिचेवर अनेक वेळा वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडितेच्या आईने बळजबरीने तिचा विवाह त्याचेशी करून दिला. विवाहाच्या काही दिवसानंतर पीडितेस उलट्या सुरू झाल्याने ती गर्भवती असल्याचे समजले. याप्रकरणी पीडितेने आई व मधुकर याच्या विरोधात नांदेड येथील मुखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर हा गुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. दोघांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार करत आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??