
फुरसुंगी/उरुळी देवाची (पुणे) : नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मध्ये भारतीय जनता पार्टीने कडवी उमेदवार म्हणून सौ. अमृता धनंजय कामठे यांना मैदानात उतरवले असून त्यांच्या प्रवेशाने प्रभागातील राजकीय तापमान थेट वाढले आहे. गेल्या पाच ते सात वर्षांत केलेल्या ठोस कामांच्या आधारे भाजपने हा प्रभाग जिंकण्याची आक्रमक रणनीती आखली असून कामठे यांच्या उमेदवारीने सत्तांतराची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
कामठे कुटुंबाची भाजपातील दीर्घ परंपरा आणि प्रभागातील नागरिकांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क हा त्यांचा सर्वात मोठा राजकीय भक्कमपणा मानला जात आहे. गावात भाजपची भिंत रचणारे पांडुरंग बापू कामठे आणि नागरिकांचे प्रश्न हाताळण्यात अग्रस्थानी राहिलेल्या धनंजय आप्पा कामठे यांच्या नेटवर्कचा थेट फायदा अमृता कामठे यांना मिळत असल्याचे स्थानिक राजकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
प्रभागात झालेली प्रमुख कामे हे या उमेदवारीचे मुख्य शस्त्र:
• फुरसुंगी–वडकी रेल्वे गेट 24 तास सुरू – वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला प्रश्न थेट मार्गी.
• वडकी–हडपसर पीएमटी बससेवा सुरू – दळणवळणाचा मोठा प्रश्न सुटला.
• रेल्वेपलीकडील वसाहतींना वीज जोडणी – शिवचैतन्य नगर, परशुराम कामठे नगरसह सर्व वस्त्यांना दिलासा.
• जळालेल्या DP चे एका दिवसात पुनर्स्थापन – शेतकरी व नागरिकांच्या अडचणीवर तातडीचा निर्णय.
• फुरसुंगी देवाची एमजी पाणीपुरवठा योजना प्रत्यक्ष सुरू – आंदोलने, पाठपुरावा आणि अखेर यश.
• सीएसआर फंडातून मनपा शाळेत कंप्युटर लॅब व फिल्टर प्लांट – शिक्षण क्षेत्रात ठोस पाऊल.
• गांधनखिळा टेकडीवर लाईट लाइन – अनेक वर्षे अंधारात असलेला परिसर उजळला.
या साऱ्यांवर आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे 100 खाटांचे शासकीय हॉस्पिटल हा मोठा आरोग्यप्रकल्प आता मंत्रालयाच्या अंतिम टप्प्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाला मिळालेली गती मतदारांमध्ये आशावाद वाढवणारी ठरत आहे.
“जनतेचा प्रश्न म्हणजे आमची जबाबदारी. २४ तासांत फोन करा—काम पूर्ण होणारच, ही माझी शंभर टक्के हमी,” असा थेट आणि स्पष्ट शब्दांत अमृता कामठे यांनी प्रभागातील मतदारांशी संवाद साधला आहे.
भाजपच्या या उमेदवारीने प्रभाग ६ मध्ये विरोधकांची समीकरणे ढासळल्याचे संकेत मिळत असून निवडणूक सरळसरळ विकास विरुद्ध दिखावा अशी होणार असल्याचे राजकीय वर्तुळाचे मत आहे.
अमृता कामठे यांच्या आक्रमक उमेदवारीमुळे प्रभाग ६ मधील स्पर्धा आता अत्यंत कडवी आणि निर्णायक टप्प्यात प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे.
Editer sunil thorat




