
हडपसर (पुणे) : सोलापूरच्या माढा तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर यांनी राबवलेल्या मदतकार्याची राज्य सरकारने दखल घेत पुण्यात महाविद्यालयाचा विशेष सन्मान केला. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते हा गौरव प्रदान करण्यात आला.
अतिवृष्टीने उद्भवलेल्या संकटानंतर महाविद्यालयाने माढा येथील कला-वाणिज्य महाविद्यालय दत्तक घेत कपडे, अन्नधान्य, शैक्षणिक साहित्य आणि आर्थिक मदत थेट पोहोचवली. NSS विभाग, कार्यक्रमाधिकारी आणि स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य पार पाडले. प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली राबवलेला उपक्रम राज्यभर आदर्शवत ठरल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गौरवोद्गारांत म्हटले.
सन्मान सोहळ्यात रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, प्राचार्य डॉ. साळुंखे, उपप्राचार्य प्रो. डॉ. दिनकर मुरकुटे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. संजय अहिवळे व डॉ. तानाजी हातेकर उपस्थित होते.
महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या सहभागामुळे संकटग्रस्त विद्यार्थ्यांना नव्याने दिलासा मिळाल्याचे सांगण्यात आले.
Editer sunil thorat



