क्राईम न्युजजिल्हा

फॅमिली फ्रेंड म्हणून घरात आला आणि घरच्याच इज्जतीवर डल्ला ; पुण्यातली चीड आणणारी घटना…

पुणे : पुण्यात गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाहीये. चोरी, दरोडा, छेडछाड, खून असे प्रकार अधूनमधून घडतच असतात. पण याहीपेक्षा अधिक संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. कुटुंबाचा जवळचा मित्र समजून घरात ये-जा करणाऱ्या 44 वर्षीय नराधमाने तब्बल सहा वर्षे आपल्या मित्राच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

विश्वासघात आणि धमकी…

2019 साली पीडिता केवळ 19 वर्षांची असताना आरोपीने तिचे कपडे बदलताना गुपचूप फोटो मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. घरात कोणी नसताना, प्रवासादरम्यान, तसेच चारचाकीतून फिरताना तो तिच्यावर जबरदस्ती करीत असे.

6 वर्षांचा काळाकुट्ट प्रवास…

2019 पासून जुलै 2025 पर्यंत आरोपीने अनेकदा धमकीच्या जोरावर पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. या नराधमाच्या वर्तनामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने अखेर कुटुंबीयांना संपूर्ण घटना सांगितली. रोजच्या आयुष्यात वावरणाऱ्या ओळखीच्या व्यक्तीकडून झालेला हा विश्वासघात ऐकून कुटुंबीय अवाक झाले आणि त्यांनी थेट पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांची कारवाई…

भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 64, 64(2)(M), 74, 351(2) तसेच POCSO Act 2012 मधील कलम 4, 8, 10, 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात करत आहेत.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??