अंबकच्या दांपत्याची किर्तीमान कामगिरी ; मिळवले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पाच पेटंट!

पुणे : प्रा. डॉ. अमोल मोहन पाटील व त्यांच्या पत्नी सौ. स्वाती अमोल पाटील या दाम्पत्याने वनस्पतीशास्त्र या विषयातील अभ्यासात्मक संशोधनातून विविध पाच पेटंट मिळवली आहेत. या संशोधनात्मक कामगिरीमुळे त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
डॉ. अमोल पाटील हे यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड येथे वनस्पतीशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत तर त्यांच्या पत्नी स्वाती अमोल पाटील ह्या रिलायन्स जिओ, मुंबई येथे डेप्युटी मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. या दांपत्याने विविध विषयावर नवीन शोध लावून आजपर्यंत पाच इंडियन पेटंट्स, एक जर्मन पेटंट व एक साऊथ आफ्रिकन पेटंट मिळवले आहे. सध्याच्या एआय वरील नवनवीन टेक्नॉलॉजी मुळे होणारे बदल व फायदे लक्षात घेऊन आपणही या टेक्नॉलॉजी सोबत बदलणे गरजेचे आहे.
संशोधन क्षेत्रातील एआय बेस प्लांट ड्रग एक्स्ट्रक्शन डिवाइस, स्मार्ट प्लांट हेल्थ मॉनिटरिंग डिवाइस, एआय बेस प्लांट व्हायरस डिटेक्शन डिवाइस, ए आय बेस प्लांट ग्रोथ डिटेक्शन डिवाइस, पोर्टेबल इन्फेक्शन डिसीज डिटेक्शन डिवाइस व ए सिस्टीम फॉर सिंथेसायझिंग असेनोमायसिड्स स्ट्रेप्टोमाइसिस फॉर प्रोडक्शन ऑफ अँटीमायक्रोबियल सबस्टन्स या शीर्षकांनी पेटंट्स फाईल करून प्रकाशित केले आहेत. आज पर्यंत डॉ. पाटील यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर आकरा शोधनिबंध व सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
आपल्या या किर्तीमान कामगिरीतून त्यांनी समाजातील नव्या पिढीला एक नवीन आदर्श घालून दिला आहे. पाटील दाम्पत्य मुळचे राहणार अंबक (चिंचणी) ता. कडेगाव, जि. सांगली येथील आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवण्यामध्ये व संशोधनातील यश संपादन करण्याकामी त्यांना यशवंतराव मोहिते महाविद्यालय पुणे येथील प्रोफेसर डॉ. एस. जी. पवार तसेच यशवंतराव चव्हाण कॉलेज कराड संस्थेचे माननीय जनरल सेक्रेटरी ए. एन. मुल्ला साहेब, संस्था सदस्य माननीय अरुण पाटील काका यांच्या प्रोत्साहनाने व प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार, प्राध्यापाक डॉ. जी. जी. पोतदार, डॉ. भरत महाडिक, यांचे मार्गदर्शन लाभले आहे. पाटील दांपत्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे…



