४० व्या दिवसाच्या विधीचा कार्यक्रम साधत चोरट्यांचा डाव; पठारे वस्तीतील मोगले कुटुंब घरफोडीचे बळी…
लोणी काळभोर पोलिसांकडून तपास सुरू; चोरट्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर...

पुणे (हवेली) : पुर्व हवेलीतील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत येथील पठारे वस्ती मधील मोगले कुटुंबाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी केली चोरी.
झाले असे की घरातील सर्वजण ४० व्या दिवसाचा विधीचा कार्यक्रमास गेले आहेत याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी लॉकरमध्ये ठेवलेले ६ लाख ६५ हजार १०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच मोबाईल फोन चोरी करून नेला असल्याची घटना घडली आहे..
याप्रकरणी शौकत शब्बीर मोगल (वय ४३, रा.- २ नंबर गल्ली, पठारे वस्ती, तुळजाभवानी मंदीराजवळ, कदमवाकवस्ती, ता. हवेली जि.पुणे, मुळ गाव मानेगाव, ता. बार्शी, जि. सोलापुर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शब्बीर हे रिक्षाचालक असुन त्याचा मुलगा साहिल विजय सेल्स मध्ये नोकरी करत असुन त्यातुन मिळणा-या उत्पन्नातुन ते उदरनिर्वाह करतात. याच दरम्यान आई मुन्नाबी शब्बीर मोगल यांचे आजारपणामुळे ७ जुन रोजी निधन झाले. दिनांक १३ जुलै रोजी आईचा ४० व्या दिवसाचा विधीचा कार्यक्रम बार्शी येथे असल्याने ते पत्नी आणि मुलांसह (दि.१२)जुलै रोजी सकाळी गावी गेले. जाण्यापुर्वी घरातील सोन्याचे दागिने, मौल्यवान न वस्तु या आमच्या घरातील लोखंडी कपाटात लॉकरमध्ये ठेवून त्याला लॉक लावले होते तसेच घराच्या दरवाजाला देखील कुलुप लावले होते. विधी झाल्यानंतर ते १४ जुलै रोजी रात्री १०/३० वाजताच्या सुमारास घरी आले तेव्हा घराच्या दरवाजाला लावलेले कुलुप हे तुटलेले दिसले. त्यानंतर घरात जावुन पाहिले असता घरातील सगळे सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाट उघडे दिसले व त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटाचे लॉक व त्यातील लॉक देखील तुटलेले व उघडे दिसले त्यावेळी कोणी तरी अज्ञात चोराने घरात प्रवेश करुन चोरी केल्याचे प्राथमिक निदर्शनास आले.
त्यानंतर मोडले कुटुंबीयांनी तात्काळ पोलीसांना फोन केला. काही वेळात पोलीस आले. त्यावेळी कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कमची पाहणी केली असता २७ हजार ३०० रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची वेढणी, ३२ हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची वेढणी, २४ हजार ८०० रुपये किंमतीची चार ग्रॅम वजनाची वेढणी, १६ हजार ८०० रुपये किंमतीची तिन ग्रॅम वजनाची वेढणी, ४ हजार ५०० रुपये किंमतीची सहा ग्रॅम वजनाची बाळी, ३९ हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची कानातील रिंग, ७० हजार रुपये किंमतीचे १२ ग्रॅम वजनाचे कुडके, २ हजार २०० रुपये किमतीची २ ग्रॅम वजनाची अंगठी, २ लाख रुपये किमतीची ३० ग्रॅम वजनाची पट्टी नेकलेस, ४५ हजार रुपये किमतीची सहा ग्रॅम वजनाची कानातील रिंग, १ लाख रुपये किमतीची ६ .५ ग्रॅम वजनाची कानातील वेल, १ लाख रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे नेकलेस, ४५ हजार रुपये किमतीचे ५.५ ग्रॅम वजनाचे पेंडंट, ४ हजार रुपये किंमतीचे ८.५ ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजन या दागिन्यांसह २ हजार ५०० रुपये रोख रक्कम, ७ हजार रुपये किंमतीचे २ मोबाईल फोन असा एकुण ६ लाख ६५ हजार १०० रुपये किंमतीचा ऐवज त्या ठिकाणी मिळून आला नाही.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मुख्य संपादक श्री सुनिल थोरात



