नवा कसोटी कर्णधार, तर उपकर्णधारपदी नवीन खेळाडू ; इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर… वाचा संपूर्ण सविस्तर !

संपादक – सुनिल थोरात
मुंबई : आयपीएलनंतर भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून यावेळी पाच कसोटी सामन्यांची मालिक खेळवण्यात येणार आहे. यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीद्वारे भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने नव्या कर्णधाराची देखील घोषणा यावेळी केली आहे.
कसोटी संघ असा राहणार…
शुभमन गिल (C), ऋषभ पंत (VC, WK), यशस्वी जायसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (WK), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव
कोण आहे कसोटी संघाचा नवा कर्णधार?
बीसीसीआयने शुभमन गिलच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घातली आहे. गिलने २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होतं. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने ४५ आणि ३५* धावांची खेळी होती. शुभमन गिलने आतापर्यंत २५ कसोटी सामने खेळले असून १४९७ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ५ शतके आणि ७ अर्धशतके झळकावली आहेत.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे…
दरम्यान, २० जूनपासून भारत आणि इंग्लंड संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यापैकी पहिली कसोटी २०-२४ जून (लॉर्ड्स), दुसरा कसोटी सामना २ ते ६ जुलै (बर्मिंगहॅम), तिसरा कसोटी सामना १० ते १४ जुलै (लॉर्ड्स), चौथा कसोटी सामना २३ ते २७ जुलै (मँचेस्टर) आणि पाचवा कसोटी सामना ३१ जुलै ते ४ ऑगस्टदरम्यान (ओव्हल, लंडन) खेळवला जाणार आहे.
WTC च्या नव्या पर्वाची सुरुवात…
महत्त्वाचे म्हणजे भारताचा इंग्लंड दौरा दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण भारत आणि इंग्लंड या कसोटी मालिकेतून वर्ल्ड
टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ पर्वातील मोहिमेची सुरुवात करणार आहेत. त्यामुळे पहिल्याच कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असणार आहेत.





