गाडीच्या केबिनचा चक्काचूर, ५० प्रवाशांच्या बसचा भीषण अपघात…

पुणे : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर एका खासगी बसने भरधाव वेगात येत एका कंटेनरला धडक दिली आहे.
या अपघातात ४० ते ५० जण जखमी झाल्याची माहिती आहे. भल्या पहाटे ४ ते ५ च्या सुमारास हा अपघात घडले. यावेळी बसमधून प्रवास करणारे प्रवासी साखर झोपेत होते. याचवेळी हा अपघात घडला आहे.
अपघातानंतर घटनास्थळी बराच वेळ गोंधळ बघायला मिळाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस पुढील कार्यवाही करत आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे हा अपघात झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी लक्झरी बसने कंटेनरला पाठीमागून धडक दिल्यानंतर अपघात घडल्याची माहिती आहे. हा अपघात इतका भयंकर होता की बसच्या ड्रायव्हर केबिनचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस चोपडा येथून पुण्याच्या दिशेनं येत होती. पुणे – नाशिक महामार्गावरून जात असताना आळेफाटा येथे या बसला अपघात झाला. यावेळी बसचा वेग जास्त असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. ज्यावेळी बसचा अपघात झाला, तेव्हा बसमधून प्रवास करणारे ४० ते ५० प्रवाशी साखर झोपेत होते. अशात अपघात झाल्याने अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. काहींना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पहाटे चार ते पाच च्या दरम्यान हा अपघात घडला आहे. या अपघातानंतर पुणे-नाशिक महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर वाहतूक सेवा सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून पुढील कार्यवाही केली जात आहे. ज्यावेळी अपघात घडला, त्यावेळी बसचालकाने मद्यप्राशन केलं होतं का? नेमका अपघात कशामुळे घडला? याचा तपास पोलीस करत आहेत.



