राजकीय
युवा नेते सुजाता आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त.; सिद्धी वृद्धाश्रम येथे धान्यवाटप व फळवाटपाचा कार्यक्रम संपन्न..

पुणे (हडपसर) : वंचित बहुजन आघाडी पुणे शहर व हडपसर विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र नव्हे तर देशातील आयकॉन युवा नेत्या सुजाता आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धी वृद्धाश्रम येथे धान्यवाटप व फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष अरविंद तायडे, उपाध्यक्ष जॉर्ज मदनकर, राजा ढाले साहेब, संघटक सतीश साबळे, सचिव प्रा. सावळे सर, सहसचिव पितांबर धीवार, वाघमारे साहेब, विधानसभा अध्यक्ष दिलीप क्षेत्रे, कोरबू साहेब, उपाध्यक्ष अमित कांबळे, दीपक गायकवाड, आणि मिलिंद सरोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सुजाता आंबेडकर यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. वृद्धाश्रमातील नागरिकांनी हा कार्यक्रम अत्यंत समाधानाने अनुभवला. सामाजिक बांधिलकी जपत अशा प्रकारचे कार्यक्रम हे वंचित बहुजन आघाडीची कटीबद्धता आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित करतात, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.




