जिल्हाशिक्षण

“रंग रूपक” भारतीय नाट्यशास्त्रा वर होणार मंथन!

तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद, राज्य सांस्कृतिक कार्य विभाग आणि एमआयटी-एडीटी स्कूल ऑफ थिएटरचे आयोजन...

पुणे : सांस्कृतिक कार्य विभाग संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा नाट्य विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंग रूपक’ या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन राज कपूर मेमोरियल थिएटर येथे मार्च २५ ते २७ दरम्यान ‘करण्यात आले आहे.

भारतीय ज्ञान परंपरेतील नाट्य संस्कृतीचा प्रसार व्हावा या हेतूने आयोजित या परिसवांदात राष्ट्रीय स्तरावरील नामांकित नाट्यदिग्दर्शक/नाट्यकर्मी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.महेश चोपडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अमोल देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.

भारत सरकारचे नागपूर येथील दक्षिण मध्य संस्कृती केंद्राच्यावतीने आयोजित या तीन दिवसीय परिसंवादाची विषयवस्तू “भारतीय ज्ञान परंपरेतील नाट्यशास्त्राची भूमिका” ही आहे. एनएसडी, नवी दिल्लीचे माजी संचालक पद्मश्री वामन केंद्रे, एनएसडी नवी दिल्लीचे कार्यकारी अध्यक्ष पद्मश्री भरत गुप्त, संगीत नाटक अकादमी, नवी दिल्लीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा, प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक पद्मश्री चंद्रप्रकाश द्विवेदी मार्गदर्शन करणार असून नाट्य क्षेत्राच्या विकासासाठी प्राचीन नाट्यशात्रीय सिद्धांताचे महत्त्व अधोरेखित करणार आहेत. तसेच प्रख्यात शास्त्रीय नर्तक पद्मश्री शशधर आचार्य, गुरुषमा भाटे, ज्येष्ठ नाट्यक्षेत्रज्ञ डॉ. संगीता गुंडेचा, पियाल भट्टाचार्य, डॉ. गौतम चार्तेजी, प्रा. संध्या रायते, डॉ. सुदनियन कुमार मोहंती आणि प्रसाद भिडे नाट्यशास्त्रातील विविध पैलूंवर मार्गदर्शन करणार आहेत.

भरतमुनी रचित नाट्यशास्त्र रंगमंच-नाट्य-अभिनय- या सह भारतीय संस्कृतीचा महत्त्वपूर्ण वारसा असून या माध्यमातून भारतीय तत्वज्ञान, मानसशास्त्र आणि सद्य स्थितीतील नाट्यचळवळ यावर देखील सखोल मंथन होणार असून विद्यार्थी तथा नाट्यरसिकांना नाट्यसाधनेचे नवनीत मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या परिसंवादास एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या आस्था गोडबोले कार्लेकर यांची उपस्थिती असणार आहे. तर कुलसचिव डॉ. महेश चोपडे, सिनेनाट्य अधिष्ठाता डॉ. मुकेश शर्मा आणि संस्कार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री अभिजीत गोखले यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

या परिसंवादाचे आयोजक डॉ. अमोल देशमुख आणि समन्वयक प्रा. सुनीता नागपाल, प्रा. निखिल शेटे, प्रा. अनिर्बन बाणिक आणि प्रा. किरण पावसकर कार्यक्रमाच्या यशासाठी अथक प्रयत्न घेत आहेत.

                     नाट्य सादरीकरणाने येणार रंगत!

या परिसंवादात प्रख्यात नाट्य तज्ज्ञाच्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थी संवाद साधणार आहेत. या सोबतच प्रथितयश नाट्यकर्मींद्वारे नाट्य सादरीकरण सादर होणार आहे. नाट्यतंत्र, नाट्य-जाणिवा विकसित करण्यासाठी “रंग रूपक” पर्वणी ठरणार आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??