क्राईम न्युज

३४ किलो ४४० ग्रॅम गांजासह कार जप्त ; १४ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत…

तुळशीराम घुसाळकर

हवेली (पुणे) : पुणे शहर पोलीस यांच्या गुन्हे शाखा युनिट ५ पथकाने कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत मोठी कारवाई करत ३४ किलो ४४० ग्रॅम वजनाचा गांजा व तस्करीसाठी वापरलेली कार जप्त केली. या कारवाईत एकूण १४ लाख ८३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय पोपटराव पाडुळे (वय ३१, रा. नवीन म्हाडा कॉलनी, सुरक्षानगर, हडपसर, पुणे) व विशाल दत्तात्रय जाधव (वय २८, रा. हिंगणे मळा, हडपसर, पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार १४ फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पेट्रोलिंग करत होते.

दरम्यान, लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील गट क्रमांक ३८०, कृपासिंधु ईस्ट सोसायटीसमोर सार्वजनिक रस्त्यावर संशयास्पद हालचाल दिसून आली. त्यावेळी आरोपी अक्षय पाडुळे व त्याचा साथीदार विशाल जाधव यांना MH-12/VT-2000 क्रमांकाच्या AURA कारसह ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान विक्रीसाठी आणलेला ३४ किलो ४४० ग्रॅम गांजा, तस्करीसाठी वापरलेली कार तसेच संपर्कासाठी वापरलेले मोबाईल हँडसेट असा एकूण १४ लाख ८३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्य तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेला अक्षय पाडुळे हा साकीनाका पोलीस स्टेशन येथे खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असून तो मागील सुमारे एक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीपान पवार व गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने केली आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??