
पुणे : जेएसपीएम जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पुणे येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतीकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे हा दिवस ‘पराक्रम दिवस’ म्हणून देशप्रेमी व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी ‘जय हिंद’, ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’ अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीने भारावून टाकला.
प्राचार्यांनी आपल्या भाषणात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शिस्तप्रिय जीवन, त्याग, धैर्य व नेतृत्वगुण आजच्या तरुण पिढीसाठी कसे मार्गदर्शक आहेत, यावर सविस्तर प्रकाश टाकला. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, त्यांचे सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक योगदान आजही तरुणांना दिशा देणारे असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी बाळासाहेबांचे आदर्श जीवनात अंगीकारावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अनुराधा पाटील व प्रा. निकिता कोलते यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. रविराज जाधव, प्रा. चेतन मामडगे, प्रा. तनुजा काशीद, स्वप्नाली सावंत, प्रियांका महाजन, विवेक थोरात, स्वाती माकोने, रुपाली शिंदे, प्रतीक्षा थोरात, ऋतुजा दाते, पांडुरंग पवार, कल्पना सुरवसे व आकांक्षा जाधव यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शिस्त, नेतृत्व व समाजभानाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.
Editer sunil thorat



