
हडपसर (पुणे) : दि. १० फेब्रुवारी २०२६
सायनशास्त्र विभागाच्या वतीने “अंतर्गत मृदा व जल विश्लेषण सल्लागार केंद्र” या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या केंद्राचे उद्घाटन विठ्ठल रणवाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एकनाथ मुंढे उपस्थित होते.
यावेळी उपप्राचार्य प्रो. डॉ. किशोर काकडे, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. रंजना जाधव तसेच विभागातील सर्व प्राध्यापकवृंद उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना विठ्ठल रणवाडे यांनी मृदा व जल परीक्षणाचे सध्याच्या काळातील वाढते महत्त्व विशद केले. कृषी उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी अशा सल्लागार केंद्रांची गरज असून, यामुळे शेतकऱ्यांना शास्त्रीय मार्गदर्शन मिळेल, असे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना संशोधन, प्रयोगशीलता आणि कौशल्यविकासाच्या दृष्टीने या केंद्राचा मोठा लाभ होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रो. डॉ. एकनाथ मुंढे यांनी या सल्लागार केंद्राच्या स्थापनेमागील उद्दिष्टे स्पष्ट केली. शेतकरी, विद्यार्थी व समाजासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार असून, पर्यावरणीय संतुलन राखण्याच्या दृष्टीनेही या उपक्रमाचे महत्त्व मोठे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजकुमार हंगारगे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विविध शाखांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या केंद्राबाबत उत्सुकता व्यक्त करत, शैक्षणिक व व्यावहारिक स्तरावर हे केंद्र अत्यंत लाभदायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Editer sunil thorat




