जिल्हाराजकीयसामाजिक

वाढदिवसाच्या निमित्ताने जनसंपर्क कार्यालय जनतेच्या सेवेसाठी खुले, कदमवाकवस्ती येथे विशाल गुजर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : कवडीपाट येथील भारतीय जनता पार्टीचे कदम वाकवस्ती शहराचे माजी अध्यक्ष तथा छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष विशाल गुजर यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रमाची सुरुवात सकाळी वृक्षारोपण करून करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वाढदिवस साधेपणाने आणि समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा करण्यावर भर देण्यात आला.

 

वाढदिवसानिमित्त कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील गुजर वस्ती, कवडीपाट व कदमवाकवस्ती परिसरात जनतेशी असलेली नाळ अधिक दृढ करत विशाल गुजर यांनी आपले जनसंपर्क कार्यालय सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी सदैव खुले असल्याची घोषणा केली. या कार्यालयाच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन व समस्या निराकरण केले जाते. स्थानिक नागरिकांना तत्पर सेवा मिळावी, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून परिसरात रक्तदान शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य तपासणी शिबिरे, गरजूंसाठी मदत उपक्रम आदी विविध समाजोपयोगी कार्यक्रम नियमित राबवले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

वाढदिवसानिमित्त कदमवाकवस्ती गावासह पंचक्रोशीतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, शेती व व्यापार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित विद्यमान सदस्या शितलताई सुजित कांबळे, कदम वाकवस्तीचे माजी सरपंच नंदू पाटील काळभोर, भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळभोर, पुणे महानगर प्राधिकरण समितीचे सदस्य तथा मांजरी गावचे माजी सरपंच स्वप्निल उंद्रे, युवा नेते गौरव काळभोरप्रतीक काळभोर, ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, युवा उद्योजक नकुल शिंदे सह परीसरातील ऊत्कृष्ट वक्ते महेश खुळपे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे युवा नेते प्रीतम काळभोर, ग्रामपंचायत सदस्य दीपक आढाळे, पत्रकार दिगंबर जोगदंड, पुणे बार कौन्सिलचे माजी सेक्रेटरी Adv. राहुल झेंडे, भाजप नेते किरण डुगणे, आनंद संप्रदाय आळंदीचे मुख्य विश्वस्त हरिभक्त पारायण सुशील महाराज काळभोर यांची उपस्थिती लाभली.

याशिवाय कवडी माळवाडीचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चांदणे, नितीन टिळेकर, पंढरपूर नगर परिषदचे सभापती प्रदीप पवार, उद्योजक अमित धुमाळ, प्रशांत उंद्रे, सुंदर हरपळे, प्रदीप गुजर, कपिल दळवी, भरत राठी, माजी सदस्य अशोक शिंदे तसेच छत्रपती ग्रुपचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कदमवाकवस्ती व लोणी काळभोर परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस सोहळा आनंदात पार पडला. यावेळी विशाल गुजर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत, “सामाजिक कार्य आणि जनतेची सेवा हेच माझे ध्येय असून भविष्यात अधिक जोमाने काम करू,” असा संकल्प व्यक्त केला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??