जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

लोणी काळभोरमध्ये मध्यरात्री प्रशासकीय स्फोट, 32 पोलिसांची एकाच फटक्यात बदली ; तात्काळ कार्य मुक्तीचे आदेश…

कदमवाकवस्ती (ता. हवेली): पुणे शहर पोलिस दलात मोठी खळबळ उडवणारा निर्णय समोर आला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तब्बल 32 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकाच आदेशात बदल्या करण्यात आल्या आहेत. हा आदेश पुणे शहर पोलीस आयुक्तालय मार्फत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी (ता. 18) रात्री उशिरा जारी केला.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 22 (एन) अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत 3 सहाय्यक फौजदार, 10 पोलीस हवालदार आणि 19 पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे. संबंधित सर्वांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले असून नव्या ठिकाणी हजर झाल्याचा अनुपालन अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या मोठ्या फेरबदलामुळे पोलिस दलात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काहीजण याकडे नियमित प्रशासकीय प्रक्रिया म्हणून पाहत असले, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावरील एकाचवेळच्या बदल्यांमुळे कारणांबाबत उत्सुकता व्यक्त होत आहे.

बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची संपूर्ण यादी… 

सहाय्यक फौजदार
संतोष सुखदेव घावटे – लोहगाव पोलीस ठाणे
विनोद ज्ञानेश्वर कांबळे – विमानतळ पोलीस ठाणे
रामदास शंकर मेमाणे – चंदननगर पोलीस ठाणे
पोलीस हवालदार
विजय नथु जाधव – लोहगाव
अश्विनी जयसिंग माळी / अश्विनी दत्ता डबाणे – लोहगाव
दिपाली दौलत पाडुळे – लोहगाव
गणेश विलास सातपुते – लोहगाव
दादा भिमराव हजारे – विमानतळ
सुनिल मदन नागलोत – विमानतळ
तेज दिपक भोसले – विमानतळ
प्रदिप भिमराव क्षिरसागर – चंदननगर
संभाजी सुभाष दिवेकर – चंदननगर
दिगंबर रामदास जगताप – चंदननगर
पोलीस अंमलदार
अजिंक्य दिपक जोजारे – लोहगाव
शैलेश चांगदेव कुदळे – लोहगाव
वैशाली महीपती निकंबे – लोहगाव
बाजीराव चंदर वीर – लोहगाव
अमोल विष्णु मुंडे – लोहगाव
चक्रधर जयद्रथ शिरगिरे – लोहगाव
राहुल सुरेंद्र माळगे – लोहगाव
ईश्वर हरीदास भगत – लोहगाव
प्रशांत प्रकाश सुतार – विमानतळ
अक्षय राजेंद्र कटके – विमानतळ
बालाजी संदीपान बांगर – विमानतळ
संदीप किशन धुमाळ – विमानतळ
प्रविन नामदेव सपकाळ – विमानतळ
मल्हारी शिवाजी ढमढेरे – विमानतळ
दिपक सुनिल सोनवणे – विमानतळ
कोमल सोमेश्वर आखाडे – विमानतळ
किशोर पांडुरंग कुलकर्णी – सिंहगड रोड पोलीस ठाणे
वसंत भानुदास चव्हाण – सिंहगड रोड
घनश्याम कुमार आडके – सिंहगड रोड

दरम्यान, लोहगाव आणि विमानतळ पोलीस ठाण्यांकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ हलविण्यात आले आहे. या बदल्यांमुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या कामकाजावर काय परिणाम होणार आणि नव्या मनुष्यबळासह संबंधित ठाण्यांची कार्यपद्धती कशी बदलणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

एकाच आदेशात 32 जणांची बदली — पुणे शहर पोलिस दलातील हा मोठा प्रशासकीय फेरबदल मानला जात आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??