आरोग्यजिल्हासामाजिक

कदमवाकवस्ती येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कदमवाकवस्तीबुधराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या शिबिरात डोळ्यांची मोफत तपासणी, गरजूंना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रियेसाठी नावनोंदणी करून मोठ्या संख्येने लाभ घेतला. अल्पदरात चष्मे उपलब्ध करून दिल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, माजी सरपंच गौरी गायकवाड, उपसरपंच नासिर पठाण, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, जयप्रकाश नाना कदम, दीपक काळभोर, सतीश काळभोर, शब्बीर पठाण, प्रकाश गायकवाड, बापूराजे गायकवाड, अतुल कदम, घाटे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक गरजू नागरिकांना थेट आरोग्य लाभ मिळाला असून ग्रामपंचायत कदमवाकवस्ती व बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवजयंतीनिमित्त आयोजित हे शिबिर ग्रामस्थांसाठी खऱ्या अर्थाने आरोग्यदायी ठरले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??