जिल्हाशिक्षणसामाजिक

नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य शितल कांबळे, पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे याचा सत्कार ; आदर्श विद्यार्थी व शिक्षकांचाही यावेळी गौरव…

लोणी काळभोर (ता. हवेली) : दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १, २ व ३, लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्या शितल सुजीत कांबळे व पंचायत समिती सदस्य अमोल त्रिंबक टेकाळे यांचा सत्कार समारंभ उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. शिक्षण क्षेत्रातील प्रगतीसाठी लोकप्रतिनिधींनी सातत्याने सहकार्य करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणी काळभोर गावचे सरपंच नागेश काळभोर होते. प्रमुख उपस्थितीत ॲड. सुजीत प्रल्हाद कांबळे, वि.का.स. सेवा सोसायटीचे अध्यक्ष संजय भिमराव भालेराव, मातंग एकता आंदोलनाचे अध्यक्ष दिगंबर जोगदंड, सामाजिक कार्यकर्ते नईम बशीर इनामदार, सामाजिक कार्यकर्त्या स्नेहल हरिश्चंद्र कांबळे, चंदा सुरेश कुंभार, भीम संघटना जिल्हाध्यक्ष राकेश रघुनाथ शेलार, गफूर भाई आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विकास भालेराव यांच्या मातोश्री कै. मालती गेणूजी भालेराव यांच्या स्मरणार्थ तिन्ही शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांना ‘आदर्श विद्यार्थी’ व शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. शैक्षणिक प्रगती, शिस्त, सामाजिक जाणीव आणि उत्कृष्ट अध्यापन या निकषांवर पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली.

जि.प. प्राथमिक शाळा लोणी काळभोर क्र. १ मधील शुभम ज्ञानेश्वर वेव्हारे (इयत्ता सातवी), जि.प. प्राथमिक शाळा लोणी काळभोर क्र. २ मधील वेदिका रमेश घुले (इयत्ता सातवी) आणि जि.प. प्राथमिक शाळा लोणी काळभोर क्र. ३ मधील सना फिरोज आलम अन्सारी (इयत्ता सातवी) यांना ‘आदर्श विद्यार्थी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच जि.प. प्राथमिक शाळा लोणी काळभोर क्र. १ मधील पदवीधर शिक्षक विकास रणदिवे, क्र. २ मधील उपशिक्षक रोहिदास मेमाणे व क्र. ३ मधील मुख्याध्यापिका बिस्मिल्ला शफी शेख यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी शाळेच्या वतीने मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेमाणे यांनी केले. तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक नेवसे मॅडम, जगताप सर, शेख मॅडम तसेच जि.प. प्राथमिक शाळा तरवडी रानमळा येथील मुख्याध्यापक देविदास शिंदे उपस्थित होते. समारोप प्रसंगी लोकप्रतिनिधींनी शिक्षणाच्या उन्नतीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तिन्ही शाळांतील सर्व शिक्षकांनी समन्वय साधून कार्यक्रमाचे नियोजन केले असून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??