
हडपसर (पुणे) : JSPM Jaywantrao Sawant Institute of Pharmacy येथील विद्यार्थ्यांनी दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी Empress Botanical Garden येथे ज्ञानवर्धक शैक्षणिक भेट दिली. जैवविविधतेचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, औषधी वनस्पतींचा सखोल अभ्यास करता यावा तसेच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. अभ्यासक्रमाशी संबंधित विषयांचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह आणि कुतूहल दिसून आले.
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी उद्यानातील विविध देशी-विदेशी वृक्षप्रजाती, दुर्मिळ वनस्पती, शोभेची झाडे तसेच औषधी वनस्पतींचा बारकाईने अभ्यास केला. मार्गदर्शकांनी प्रत्येक वनस्पतीचे शास्त्रीय नाव, औषधी उपयोग, पर्यावरणातील भूमिका आणि संवर्धनाची गरज याविषयी सविस्तर माहिती दिली. फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी विशेषतः औषधी वनस्पतींच्या घटकद्रव्यांबाबत आणि औषधनिर्मितीतील त्यांच्या उपयोगांविषयी माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी निरीक्षण नोंदी, छायाचित्रे आणि टिपणे तयार करून सहलीचा शैक्षणिक लाभ घेतला.
निसर्गरम्य आणि हिरव्यागार वातावरणात विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. वृक्षसंवर्धन, जलसंधारण आणि जैवविविधतेचे जतन या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारून शंका निरसन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे सैद्धांतिक ज्ञान अधिक दृढ झाले असून पर्यावरणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित झाला आहे.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर तसेच जेएसपीएम हडपसर शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. वसंत बुगडे आणि डॉ. मारुती काळबांडे यांनी शुभेच्छा व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रा. तनुजा काशिद यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रा. अनुराधा पाटील, प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. रविराज जाधव, प्रा. निकिता कोलते, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. चेतन ममडगे, विवेक थोरात, स्वप्नाली सावंत, प्रियांका महाजन, स्वाती माकोणे, रूपाली शिंदे, प्रतीक्षा थोरात, ऋतुजा दाते, पवार काका, कमल बनसोडे व आकांक्षा जाधव यांनी सहकार्य केले.
Editer sunil thorat



