आरोग्यसामाजिक

लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ पुरस्कार…

तुळशीराम घुसाळकर

लोणी काळभोर (ता. हवेली) : सेवा परिणामकारकता, मातामृत्यू व बालमृत्यू नियंत्रण, कुटुंब कल्याण कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, शस्त्रक्रिया कार्यक्षमता, वाढती रुग्णसंख्या आणि डिजिटल आरोग्य जोडणी या महत्त्वपूर्ण निकषांवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्य सरकारकडून देण्यात येणारा मानाचा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे रविवारी (२२ फेब्रुवारी) पार पडलेल्या राज्यस्तरीय सोहळ्यात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सन २०२५-२६ या वर्षातील उत्कृष्ट आरोग्य सेवा, रुग्णाभिमुख उपक्रम आणि डिजिटल आरोग्य व्यवस्थापनातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.

यावेळी “महाआरोग्य सन्मान” सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात महाराष्ट्र पॅलेटिव्ह केअर उपक्रमाचा शुभारंभ तसेच मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व अति. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली “भक्ती विठ्ठलाची, सेवा आरोग्याची” या उपक्रमांतर्गत आळंदी-देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्यात उत्कृष्ट नियोजन व आरोग्य नियंत्रण केल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनाही सन्मानित करण्यात आले.

तसेच आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (HMIS) मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहबूब लुकडे व वाघोली येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्याबद्दल आशा सेविका शोभा सोनबा खेडकर (रांजणगाव), त्यांच्या गट प्रवर्तक आशा सुर्वे व जिल्हा समूह संघटक कीर्ती तागड यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

डॉ. मेहबूब लुकडे यांनी सांगितले की, “लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या सातत्यपूर्ण परिश्रमांचे हे फलित आहे. तळागाळातील आरोग्य कर्मचारी, आशाभगिनी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या सांघिक प्रयत्नांमुळेच आम्ही हा मानाचा ‘आरोग्यरत्न’ पुरस्कार मिळवू शकलो. हा सन्मान भविष्यात अधिक दर्जेदार व लोकाभिमुख सेवा देण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.”

या यशामुळे लोणी काळभोर परिसरात समाधान व्यक्त होत असून आरोग्य विभागाच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??