जिल्हासामाजिक

जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा…

हडपसर (पुणे) : जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे सोमवार, दिनांक ९ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी काळेपडळ पोलीस चौकी, पुणे येथील पोलीस उपनिरीक्षक (PSI) जयश्री पाटोळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच पोलिस कॉन्स्टेबल पल्लवी पटाट आणि किरण घाडगे यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना PSI जयश्री पाटोळे यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्व, महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध असलेली कायदेशीर मदत तसेच समाजात महिलांची वाढती भूमिका याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा आणि कोणत्याही अडचणींना धैर्याने सामोरे जाण्याचा संदेश दिला.

यावेळी महिला दिनानिमित्त महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी तसेच मावशी यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांनीही महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना महिलांचा सन्मान व समानतेची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्रा. अनुराधा पाटील व विद्यार्थ्यांनी केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी , प्रा. स्वप्निल गाडेकर, प्रा. रविराज जाधव, प्रा. निकिता कोलते, प्रा . प्रगती लागदिवे, प्रा. चेतन मामडगे, प्रा. तनुजा काशिद तसेच विवेक थोरात ,प्रियंका महाजन, ऋतुजा दाते स्वप्नाली सावंत, स्वाती माकोने, रूपाली शिंदे, प्रतिक्षा थोरात, सुरवसे आणि आकांक्षा मावशी, पांडुरंग पवार यांचे सहकार्य लाभले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??