जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

कर्तव्यातील गंभीर हलगर्जीपणाचा फटका : लोणी-काळभोरचे ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब वनवे निलंबित…

लोणी-काळभोर (ता. हवेली) : (दि. ११ मार्च) कर्तव्य बजावताना गंभीर हलगर्जीपणा केल्याप्रकरणी लोणी-काळभोर येथील ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब श्रीपती वनवे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. प्रशासनाच्या कामकाजात झालेल्या गंभीर त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, लोणी-काळभोर यांनी सादर केलेल्या अहवालानंतर हा प्रकार उघडकीस आला. संबंधित अधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांनी कर्तव्यात अक्षम्य व गंभीर हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ४ (१) (अ) अंतर्गत अधिकार वापरून त्यांना तात्काळ निलंबित केले. तसेच त्यांच्या विरोधात नियम ८ नुसार शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

निलंबनाच्या आदेशानुसार पुढील आदेश होईपर्यंत बाळासाहेब वनवे निलंबित राहणार असून त्यांच्या निलंबन काळातील मुख्यालय तहसील कार्यालय जुन्नर येथे निश्चित करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे. तसेच निलंबनाच्या कालावधीत कोणतीही खासगी नोकरी स्वीकारू नये किंवा कोणताही व्यवसाय करू नये, असेही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, लोणी-काळभोर अपर तहसील कार्यालयाने वनवे यांच्या दप्तराची सविस्तर तपासणी करून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ८ नुसार विभागीय चौकशीचा प्रस्ताव एक महिन्याच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

या कारवाईमुळे महसूल विभागातील निष्काळजीपणावर प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणामुळे लोणी-काळभोर परिसरातील महसूल विभागातील इतरही संशयास्पद प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील काळात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केल्याने महसूल यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??