जिल्हामहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

‘विकसित भारतासाठी सर्वांची सामूहिक जबाबदारी’ – माजी खासदार वंदना चव्हाण…

लोणी काळभोर (ता. हवेली) : प्रत्येक सरकारी योजनेमागील उद्देश सकारात्मक असला तरी प्रभावी अंमलबजावणीअभावी अनेक योजना अपेक्षित प्रमाणात जनसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. ‘विकसित भारत’ ही संकल्पना प्रेरणादायी असली तरी तिच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रत्येक भारतीयाची सामूहिक जबाबदारी महत्त्वाची आहे, असे मत माजी खासदार तथा पुण्याच्या माजी महापौर वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.

एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस (एमआयटी-एसआयसीएस) यांच्या वतीने ‘विकसित भारत @2047 : सबलीकृत नागरिक, सक्षम धोरणे आणि मजबूत संस्था’ या विषयावर भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (ICSSR) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय परिषदेत त्या बोलत होत्या.

विकसित भारत घडविताना पर्यावरणीय शाश्वतता ही विकासाची मूलभूत अट असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. आर्थिक प्रगती ही पर्यावरण संरक्षण, शाश्वत शहरी नियोजन आणि जबाबदार सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या समन्वयातूनच साध्य होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक सुविधा उभारल्यानंतर त्या तात्काळ नागरिकांसाठी कार्यान्वित होणे आवश्यक असल्यावरही त्यांनी भर दिला.

या परिषदेत सार्वजनिक धोरण, सुशासन, भारतीय ज्ञानपरंपरा तसेच परराष्ट्र धोरण या विषयांवर संशोधनपर लेख सादर करण्यात आले. देशभरातील विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि धोरणतज्ज्ञांनी सहभाग नोंदवत २०४७ पर्यंत विकसित, आत्मनिर्भर आणि संस्थात्मकदृष्ट्या सक्षम भारत घडविण्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली.

एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास कुलगुरू डॉ. राजेश एस., डेक्कन इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे उपसंचालक प्रा. डॉ. अल्विटे निंगथौजाम, प्रॉव्होस्ट डॉ. सायली गणकर, एमआयटी-एसआयसीएसचे संचालक डॉ. सुजित धर्मपात्रे तसेच परिषदेचे समन्वयक डॉ. विकास कोळेकर उपस्थित होते.

प्रमुख वक्ते डॉ. जोशी यांनी ‘विकसित भारत’ ही संकल्पना भारतीय संस्कृती, मूल्यव्यवस्था आणि सक्षम संस्थात्मक रचनेवर आधारित असावी, असे मत मांडले. प्रॉव्होस्ट डॉ. गणकर यांनी राष्ट्रनिर्मितीत विद्यापीठांची भूमिका स्पष्ट करत संशोधन, धोरणात्मक नवकल्पना आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

समारोप सत्रात प्रा. डॉ. निंगथौजाम यांनी पश्चिम आशियातील बदलते भू-राजकीय समीकरण आणि भारताच्या सक्रिय परराष्ट्र धोरणाची गरज यावर मार्गदर्शन केले. विश्वशांती प्रार्थनेने प्रारंभ झालेल्या या परिषदेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??