जिल्हाराजकीयसामाजिक

सांगवी सांडस गावातील सहा महिन्यांपासून बंद असलेला रस्ता नागरिकांसाठी अखेर खुला…

हवेली : (दि. ११ मार्च २०२६) हवेली तालुक्यातील सांगवी सांडस गावातील गावठाण भागातील सहा महिन्यांपासून बंद असलेला रस्ता बुधवारी (दि. ११) अखेर सुरू करण्यात आला. दुपारी सुमारे १.३० वाजल्यापासून प्रशासन, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रश्न मार्गी लागला.

गावठाणातील मीनाताई लोले यांच्या घरापासून सूर्यकांत लोले व भरत शेठ लोले यांच्या घरादरम्यानचा रस्ता काही कारणास्तव मागील सहा महिन्यांपासून बंद होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर “राजा शिवछत्रपती शिबिर”च्या माध्यमातून प्रशासन, ग्रामपंचायत आणि गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या चर्चेनंतर हा प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी मंडळ अधिकारी काळे मॅडम, तलाठी, पोलीस यंत्रणा, पोलीस पाटील, ग्रामसेवक तसेच कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली आणि तरुण कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून अखेर रस्ता सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.

या वेळी हर्षद लोले, सूर्यकांत लोले, भरत लोले, नानासाहेब लोले आणि अविनाश लोले या तरुण कार्यकर्त्यांनी मांडलेल्या सकारात्मक भूमिकेचे सर्वांनी स्वागत केले. त्यांच्या पुढाकारामुळे रस्ता सुरू करण्याच्या निर्णयाला सर्वांनी निसंकोच पाठिंबा दिला.

ग्रामपंचायत सांगवी सांडस, गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून अखेर हा प्रश्न सुटला. रस्ता सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व संबंधित अधिकारी, ग्रामस्थ आणि सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे आभार मानण्यात आले असून, भविष्यातही गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??