क्राईम न्युजजिल्हासामाजिक

बुकिंगचे ५ लाख रुपये घेऊन प्लॉट न विक्री ; खरेदीखत न करता फसवणुकी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल…

तुळशीराम घुसाळकर

लोणी काळभोर (ता. हवेली) : राहण्यासाठी जागेची गरज असताना प्लॉट बुकिंगच्या नावाखाली ५ लाख रुपये घेऊनही प्लॉट विक्री न करता व खरेदीखत न करता फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी काळूराम बाळासाहेब लवांडे (वय ३३, रा. मांजरी ग्रीन वूड, शेवाळवाडी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सतेज चंद्रशेखर पाषाणकर (रा. धायरी, पुणे), राहुल लक्ष्मण सुतारनितीन जगताप यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

घटनेची सविस्तर माहिती अशी लवांडे हे राहण्यासाठी जागा शोधत असताना ३ फेब्रुवारी २०२३ रोजी लोणी काळभोर हद्दीतील गट नं. २/२, पाषाणकर बाग येथे ते मामांसह गेले. जागा विक्रीचा फलक दिसल्याने त्यांनी चौकशी केली असता, सदर जमीन सतेज पाषाणकर यांची असून त्यांनी ती प्लॉटिंग व विक्रीसाठी एजंट राहुल सुतार आणि नितीन जगताप यांच्याकडे दिल्याची माहिती त्यांना मिळाली.

त्यातील प्लॉट आवडल्याने प्रती गुंठा १४ लाख रुपये असा भाव ठरला. लवांडे यांनी कर्ज काढून ५ लाख रुपये टोकन म्हणून दिले. त्यावेळी ११ गुंठ्यांनंतर खरेदीखत केले जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र दीड वर्ष उलटूनही खरेदीखत न झाल्याने त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू केला.

दरम्यान, सतेज पाषाणकर यांनी जमीन गणेश गायकवाड यांच्या नावे विक्रीसाठी हस्तांतरित केल्याचे समोर आले. चौकशीदरम्यान पाषाणकर यांनी भाव वाढल्याचे सांगत सदर जमिनीचा भाव प्रती गुंठा २० लाख झाला असून खरेदीखत करायचे असेल तर वाढीव रक्कम जमा करावी लागेल, अन्यथा दिलेल्या ५ लाखांच्या बदल्यात १० लाख रुपये परत मिळतील, अशी ऑफर लवांडे यांना दिली.

लवांडे यांनी १० लाख परत मागितल्यावर पाषाणकर यांनी उलट टोकनच्या पावत्या बनावट असल्याचे सांगत पैसे देण्यास नकार दिला. “जागा किंवा पैसे काही मिळणार नाहीत, तुम्हाला काय करायचे ते करा,” असे म्हणून ते निघून गेले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लवांडे यांनी पोलिसांत तक्रार दिली. मात्र दीर्घकाळ कोणतीही कारवाई न झाल्याने पोलिसांनी डीसीपी, परिमंडळ ६ यांची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले. परवानगी आणल्यानंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे हे करत आहेत.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??