
हडपसर (पुणे) : एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर येथील कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड अॅप्लिकेशन विभागाच्या वतीने ‘एस. एम. टेक्नो व्हान्झा 2K26’ या आंतरमहाविद्यालयीन तांत्रिक स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या परिसरात पार पडलेल्या या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली तांत्रिक कौशल्ये आणि सर्जनशीलता प्रभावीपणे सादर केली.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एकनाथ मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्पर्धेचे समन्वयक म्हणून उपप्राचार्य डॉ. दिनकर मुरकुटे व उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे यांनी कार्य पाहिले. विभागप्रमुख डॉ. संगीता यादव तसेच प्रा. संजय अहिवळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व समन्वयाची जबाबदारी सांभाळली. प्रा. सोनाली शिवरकर यांनी संयोजक म्हणून काम पाहिले, तर प्रा. नयन पाटील यांनी खजिनदार म्हणून जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अभिजीत दंडवते (प्राचार्य, ढोले पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधन, पेटंट आणि तांत्रिक कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शन केले. ‘एस. एम. टेक्नो व्हान्झा 2K26’ या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्ये, सर्जनशीलता, टीमवर्क आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करणे हा होता.
या स्पर्धेत वेब अॅप डेव्हलपमेंट, पोस्टर प्रेझेंटेशन, मॉडेल प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, ब्लाइंड कोडिंग, क्विझ स्पर्धा, ट्रेझर हंट तसेच फूड फेस्टिव्हल अशा विविध शैक्षणिक आणि कौशल्याधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रकल्पांमधून, वेब अॅप्लिकेशन मॉडेल्स आणि पोस्टर सादरीकरणांमधून त्यांची कल्पकता आणि तांत्रिक कौशल्ये प्रभावीपणे दिसून आली. ट्रेझर हंट व क्विझ स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, तर फूड फेस्टिव्हलमुळे कार्यक्रमाला वेगळी रंगत प्राप्त झाली.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हर्षल वाणी (मॅनेजर, Veracity Pvt. Ltd.), स्वप्नील सूर्यवंशी (सिनिअर जावा डेव्हलपर) व मयूर पाटील (सिनिअर जावा डेव्हलपर) उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राचार्य डॉ. एकनाथ मुंढे यांनी सर्व संयोजक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अशा प्रकारचे तांत्रिक व शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला ‘एस. एम. टेक्नो व्हान्झा 2K26’ हा आंतरमहाविद्यालयीन महोत्सव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
Editer sunil thorat






