क्राईम न्युज

सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल व जिवंत काडतूस जप्त; न-हे पोलिसांची नियोजनबद्ध कारवाई…

पुणे : शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी न-हे पोलीस स्टेशनच्या पथकाने राबविलेल्या विशेष मोहिमेत सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. दि. ३० मार्च २०२६ रोजी सायंकाळी मानस ग्राऊंड परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीविरुद्ध आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे तसेच पोलीस अंमलदार चव्हाण, कोंडे, भोरडे आदींचे पथक न-हे पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई व संशयित इसमांची तपासणी करत होते. त्याचवेळी पोलीस अंमलदार देवा चव्हाणशाहू राठोड यांना त्यांच्या खात्रीशीर बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मानस ग्राऊंड परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या फिरत असून त्याच्याकडे पिस्टल आहे.

ही गंभीर माहिती तत्काळ पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे यांना कळविण्यात आली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना याबाबत अवगत केले. वरिष्ठांच्या सूचनेनुसार माहितीची खात्री करून तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने परिसरात सापळा रचला. सायंकाळी सुमारे ७.२० वाजता संशयित इसम कोणालाही संशय न येऊ देता पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला. पकडल्यानंतर संबंधित इसम अत्यंत घाबरलेला व चुळबुळ करणारा दिसत असल्याने पोलिसांना संशय अधिक बळावला. त्याची ओळख पटविताना त्याने आपले नाव अमोल पद्माकर सोळंके (वय २४) असे सांगितले. तो मूळचा बीड जिल्ह्यातील आनंदगाव येथील रहिवासी असून सध्या धायरी व नांदेड सिटी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी पंचांसमक्ष त्याची सखोल झडती घेतली असता त्याच्या कमरेला लपवून ठेवलेली एक लोखंडी पिस्टल व एक जिवंत काडतूस आढळून आले. तत्काळ ही दोन्ही वस्तू जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली.

या प्रकरणी न-हे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर १२५/२०२६ नोंदविण्यात आला असून आर्म अॅक्ट कलम ३.२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे करीत आहेत.

ही संपूर्ण कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त संभाजी कदम, सह पोलीस आयुक्त अजय परमार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
दरम्यान, या कारवाईमुळे परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??