क्राईम न्युज

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; चालक फरार, गुन्हा दाखल…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : सोलापूर–पुणे महामार्गावर भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार, २१ एप्रिल रोजी दुपारी घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बेफाम व निष्काळजी वाहनचालकांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.

या अपघातात गौरीशंकर शिवराज सपळे (वय ३५, रा. देवराज देवभूमी, गुनवडी रोड, बारामती, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचे भाऊ शिवशंकर शिवराज सपळे (वय ३८, रा. बेळन, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात डंपर चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गौरीशंकर सपळे हे बारामती येथील स्टेशन रोडवरील भंडारी सराफ येथे सेल्समन म्हणून कार्यरत होते. ते पत्नी व दोन मुलांसह बारामती येथे वास्तव्यास होते. घटनेच्या दिवशी, २१ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता ते कामानिमित्त त्यांच्या हिरो डिलक्स (क्र. एमएच ४२ व्हीएल ०३८०) या दुचाकीवरून बारामतीहून पुण्याकडे निघाले होते.

दुपारी अंदाजे १.५६ वाजण्याच्या सुमारास ते सोलापूर–पुणे महामार्गावरील वाकवस्ती येथील प्रगती मंगल कार्यालयासमोर आले असता, मागून भरधाव वेगाने आलेल्या भारत बेंझ कंपनीच्या (क्र. एमएच १२ वायक्यू ९७६३) डंपरने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की सपळे रस्त्यावर फेकले गेले व त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर डंपर चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी सपळे यांना मदत केली. स्थानिक नागरिक संतोष भंडारी यांनी तत्परता दाखवत त्यांना खाजगी वाहनातून लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेतली आहे. फरार डंपर चालकाचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

दरम्यान, सोलापूर–पुणे महामार्गावर वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः जड वाहनचालकांकडून होणारी बेफाम वेगाने वाहने चालवणे, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष आणि अपघातानंतर पळ काढण्याच्या प्रकारांमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??