
पुणे, दि. २ मे २०२६ : समाजातील कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी महिलांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने कस्तुरी राईज फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘राजमाता जिजाऊ माँसाहेब – महाराष्ट्राची हिरकणी पुरस्कार ’ या संकल्पनेवर आधारित राज्यस्तरीय गुणवंत सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. प्राधिकरण, निगडी येथील ग. दी. माडगूळकर मिनी ऑडिटोरियममध्ये सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श, गुणवान आणि कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे, कीर्ती अमोल बोंगर्डे / कंझरकर यांना नवजीवन महिला गृह उद्योग संचालिका त्यांच्या सामाजिक व उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘महाराष्ट्र हिरकणी पुरस्कार’ २०२६ राज्यस्तरीय गुणवंत सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. आपल्या मनोगतात मान्यवरांनी महिलांचे समाजातील योगदान अधोरेखित करत, त्यांच्या सशक्तीकरणासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता व्यक्त केली. “महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून समाजाला दिशा दिली आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करणे म्हणजे समाजाच्या प्रगतीला चालना देणे होय,” असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर शर्मिलाताई बाबर, सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर, उपमहापौर शैलजाताई अभिनाश मोरे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अभिनेते विजय कदम, साहित्यिक व कवी बापूसाहेब पिंगळे, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक चंद्रकांत विसपुते, माजी संचालक रवींद्र चव्हाण तसेच अॅड. विजय खोबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून अमित गावडे, भरत वाल्हेकर, पल्लवी वाल्हेकर, नामदेव ढाके, लेफ्ट. डॉ. जितेंद्र देसले, प्रविण माळी, अनुप मोरे, शरद पाटील, शेखर चिंचवडे, डॉ. अनिल बिराजदार, राजेंद्र वाघ यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
या भव्य सोहळ्याचे नियोजन व आयोजन विजया सुरेश मानमोडे, हर्षदा गायकवाड आणि अभिजित मानमोडे यांनी अत्यंत उत्तम प्रकारे केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
समाजातील महिलांच्या कार्याचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांचे मनोबल वाढवणे आणि त्यांच्या कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
या सोहळ्यामुळे पुण्यासह राज्यभरातील महिलांना प्रेरणा मिळाली असून, महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे.
Editer sunil thorat





