
डाँ गजानन टिंगरे
आनंदनगर (दि. ४ मे २०२६) : येथील आनंदनगर गावामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५७० वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या जयंती उत्सवाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, आनंदनगर यांच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात धम्म रॅलीने करण्यात आली. ही रॅली कार्यक्रम स्थळापासून श्यामनगर मार्गे निळ ध्वज कट्ट्याचे पूजन करून आनंदनगरच्या मुख्य रस्त्याने पुन्हा कार्यक्रम स्थळी परत आली. त्यानंतर त्रिसरण, पंचशील व बुद्धपूजेद्वारे मुख्य कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य चंद्रकांत कांबळे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार समितीच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमास सरपंच रोहित भैया मोहोळकर, लघुउद्योजक रामेश्वर तात्या माने, उपसरपंच सुधाकर कणसे, मंगेश गांधी, प्राचार्य चंद्रकांत सोळसे, रवींद्र ताबे, संजय आप्पा शिंदे, ॲड. विकास पवार, सेवानिवृत्त प्राचार्य बाळासाहेब सर्वगोड, हर्षवर्धन गायकवाड, छगन साबळे, भारत कांबळे, रमेश लोंढे, बबन करे, शेलार सर, सुरेश अर्जुन सर, तसेच सेवानिवृत्त शास्त्रज्ञ लोंढे साहेब, प्रा. डॉ. तायाजी लोंढे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, तसेच आनंदनगर व परिसरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उखळमाळ, नऊदारे, रत्नपुरी, लासुर्णे तसेच वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडमधील कामगारांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत कांबळे, पुंडलिक सोनवणे, अलंकार पोळ, जतीन वाघमारे, प्रवीण धाईंजे, ऋषिकेश लोंढे, विजय बनसोडे, नानासाहेब लोंढे, मंगेश लोंढे, केतन मिसाळ आदींनी केले. बौद्धाचार्य भोसले मामा व बौद्धाचार्य मिलिंद मिसाळ यांनी त्रिसरण-पंचशील व बुद्धपूजा संपन्न केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त शिक्षक पुंडलिक सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी धम्मपालन गाथा घेऊन समारोप करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्वांना स्नेहभोजन व खीरदान देण्यात आले. सायंकाळी प्राचार्य जीवन दादा शिंदे (सोलापूर) यांच्या बुद्ध-भीम गीतांच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. नाथाभाऊ सरतापे व स्वप्निल सरतापे यांनीही कार्यक्रमात रंगत आणली.
या यशस्वी कार्यक्रमासाठी सर्व धर्मीय बांधवांनी दिलेल्या सहकार्याबद्दल समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
Editer sunil thorat




