ताज्या घडामोडी

भारतीय संविधान सभेतील व स्वातंत्रलढ्यातील महिलांच्या कर्तृत्वाचा जागर…

सुनिल थोरात (प्रतिनिधी)

मेरी रातें, मेरी सड़कें उपक्रमाची सहावी रात्र संपन्न..

पुणे  : आपला भारत देश घडवण्यात व देशाचं संविधान बनवण्यात महिलांचेही मोलाचे योगदान आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणाऱ्या आणि सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या तसेच संविधान समितीत सहभागी असणार्‍या पंधरा महिलांचा इतिहास व त्यांचे योगदान विविध कारणांनी लोकांपर्यंत पोहचले नाही, या अग्निशिखांचा अल्प परिचय माहित करून घेण्यासाठी व त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

निमित्त होते महिला जागर समिती, पुणे आयोजित मेरी रातें, मेरी सड़कें उपक्रमाची ही रात्र शनिवार, ३० नोव्हेंबर २०२४ रात्री ८ वाजता छ. संभाजी गार्डन येथील फुटपाथवर करण्यात आली. उपक्रमाची सुरुवात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात विरांगणांच्या कहाण्यांचे पोस्टर्स लावून, त्यांच्या कहाण्या सांगून साजरी केली गेली.

महिला जागर समितीच्या संयोजकांपैकी स्मिता शेट्टी, संगीता पाटणे, असुंता पारधे, शोभा करंडे, जीविका उठाडा, रंजना पासलकर, वर्षा सपकाळ यांनी स्वातंत्र्यलढ्यातील व संविधान सभेतील विविध अज्ञात विरांगणांच्याबाबत माहिती सांगितली. मुक्ताई फाऊंडेशनच्या इंदिरा बागवे, अनुसया फाऊंडेशनच्या स्वाती पोकळे, रविंद्र केअर फाऊंडेशनच्या प्राजक्ता जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रद्धा रे.रा. यांनी केले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश्याने आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केललेला मजूकरा विषयाबाबत काही वाद तक्रार उदभवल्यास न्याय क्षेत्र बारामती, ता. बारामती जिल्हा पुणे असा असेल. मुख्य संपादक - श्री सुनिल थोरात, संपादक - श्री. डॉ गजानन टिंगरे संपर्क क्रमांक - 8411833101

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??