कृषी व्यापार

मालमत्तेवर हक्कसोड पत्र केले तरी नाव कमी का होत नाही? सविस्तर माहिती जाणून घ्या काय आहे कारण?

महाराष्ट्र : कुठल्याही मालमत्तेचा हस्तांतरण किंवा हक्क सोडण्यासाठी हक्कसोड पत्राचा वापर केला जातो. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे, ज्यात एखादी व्यक्ती आपल्या मालमत्तेवरचे हक्क (Hakka Sod Patra) दुसऱ्या व्यक्तीस सोडते.

परंतु अनेक वेळा हक्कसोड पत्रावर सही केल्यानंतरही त्या व्यक्तीचे नाव संबंधित मालमत्तेच्या नोंदणीतून काढले जात नाही. यामागची कारणे काय आहेत, हे पाहूया.

हक्कसोड पत्र वापरण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मालमत्तेवरील हक्क दुसऱ्या व्यक्तीस देणे किंवा त्याचा त्याग करणे. हक्कसोड पत्र देणारी व्यक्ती मालमत्तेवर आपला हक्क सोडल्याचे घोषित करते, आणि हक्क घेत असलेली व्यक्ती तो हक्क स्वीकारते. परंतु, हक्कसोड पत्राची प्रक्रिया योग्य प्रकारे पार पडली तरी कधी कधी त्या व्यक्तीचे नाव मालमत्तेच्या नोंदणीतून काढले जात नाही. याचे मुख्य कारण म्हणजे हक्कसोड पत्राची नोंदणी झाल्यानंतर त्याची सरकारदप्तरी नोंद न होणे.

मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२ च्या कलम १२३ नुसार, कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी ती नोंदणीकृत असावी लागते. हक्कसोड पत्राच्या नोंदीसाठी संबंधित दस्तऐवज तपासले जातात आणि नोंदणी केली जाते. जर हक्कसोड पत्राची नोंदणी योग्य प्रकारे न झाल्यास, त्या व्यक्तीचे नाव संबंधित मालमत्तेच्या रेकॉर्डमध्ये कायम राहू शकते.

हक्कसोड पत्र तयार करताना, तलाठी कार्यालयामध्ये नोंदणी आवश्यक असते. त्यात कागदपत्रांची तपासणी आणि संबंधित तपशीलांचा समावेश केला जातो. हक्कसोड पत्राची नोंदणी करण्यासाठी व्यक्तीच्या नाव, पत्ता, वय, धंदा, कुटुंबातील वंशावळीचा तपशील आणि साक्षीदारांचे विवरण आवश्यक असते.

महसूल विभागाचे तज्ज्ञ अजिंक्य कदम म्हणाले, ‘शहरी आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी मालमत्तेच्या खटल्यांमध्ये हक्कसोड प्रमाणपत्र तयार केले जाते. जर एखादी व्यक्ती तिच्या मालमत्तेतील हिस्सा सोडत असेल, तर ती व्यक्ती हक्कसोड प्रमाणपत्रावर सही करते. त्यानंतर ती व्यक्ती वंशपरंपरागत मालमत्तेवर कोणताही हक्क न ठेवता ती त्याचा त्याग करते.’

नोंदणी प्रक्रियेनंतर, हक्कसोड पत्राचे वैधतेचे प्रमाण ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील संबंधित नोंदीच्या कागदपत्रांमध्ये समाविष्ट होते. त्यामुळे, हक्कसोड पत्र देणाऱ्या व्यक्तीचे नाव त्या मालमत्तेच्या रेकॉर्डवरून काढले जाते, असेच मानले जाते.

पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

👉🏻”द पाॅईंट न्युज 24″- https://thepointnews24.in/
👉🏻फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
👉🏻ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
👉🏻इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
👉🏻डेलीहंट पेज – https://profile.dailyhunt.in/sunil24
👉🏻वाॅटसअप ग्रुपला अॅड होण्यासाठी – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj लिंकवर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??