राजकीय
शिरूर तालुक्यातल्या मुली.. अन् रात्रीची वेळ.. लाडक्या बहिणीच्या सुरक्षेसाठी लाडका भाऊ आला धावून..! धावुन..

पुणे : रात्रीची वेळ…मुंबईतल्या अनोळखी रस्त्यावर शिरूर तालुक्यातल्या मुली पोलीस भरतीच्या परीक्षेला आलेल्या…इतक्या रात्री जायचे कोठे सगळ्यांना एकच सवाल.. मात्र अर्ध्या रात्रीही शिरूर तालुक्यातील मुलींसाठी जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष प्रदीप कंद आले धावून..!
शिरूर तालुक्यातील मुलींसाठी प्रदीप कंद यांनी राहण्याची सोय केलीच, परंतु त्यांच्या सुरक्षेचीही काळजी घेतल्याने प्रदीप कंद देवदूतासारखे धावून आले आहे.
याबाबत सविस्तर असे की, शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील सुमारे दहा ते बारा मुली या मुंबई शहरात पोलीस भरतीसाठी शुक्रवार दि.१० रोजी गेल्या होत्या. मुंबई शहरात रात्री उशिरा तेथे पोहोचल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांनी मुक्कामासाठी विचारणा केली, मात्र काही ठिकाणी त्यांना जादा दराचे भाडे परवडणारे नव्हते, तर काही ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न देखील होता.
ग्रामीण भागातील मुलींना मुंबईत राहणे आवाक्याबाहेर असल्याने आता करायचे काय? असा सवाल सगळ्यांकडे उपस्थित झाला होता. यावेळी ही बाब शिरूर तालुक्यातील युवकांना समजली. त्यांनी तत्काळ वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार यांना सांगितली. यावेळी सरपंच शेलार यांनी तत्काळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या कानावर ही बाब घातली. प्रदीप कंद यांनी रात्रीच्या अकरा वाजता ही क्षणाचाही विलंब न करता त्यांचे स्वीय सहाय्यक सुशांत लिमये यांना स्वतः मुली ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी मदतीसाठी मुलींच्या सुरक्षेसाठी पाठवले.
यावेळी लिमये यांनी मुलींची भेट घेऊन मुलींची राहण्याची व्यवस्था केली, तसेच या मुलींना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देखील दिले. शिरूर तालुक्यातील सर्व मुली या सर्वसामान्य कुटुंबातील व गरीब घरातील असल्याने व मुंबईच्या ठिकाणी अचानक रात्री ओढवलेल्या या प्रसंगाने मुली घाबरलेल्या होत्या, परंतु जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे धावून आले व रात्रीच्या वेळी तत्परता दाखवल्यानेच शिरूर तालुक्यातील सर्व मुलींचा राहण्याचा प्रश्न सुटला.
डेलीहंट पेज – https://profile.dailyhunt.in/sunil24



