क्राईम न्युज

क्रुझर गाडीची उसाच्या ट्रॅक्टरला धडक; १ मृत्यू, ५ जखमी..; डाळज…

डॉ गजानन टिंगरे

पुणे (इंदापूर) : सोलापूर वरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या क्रुझर गाडीने उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने मोठा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहे.

इंदापूर तालुक्यातील भादलवाडी गावच्याहद्दीत टॉवेल कंपनी शेजारी आज सकाळी ही घटना घडली. महामार्ग पोलीस मदत केंद्र डाळज यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजता सोलापूर वरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या क्रूझर गाडीने उसाने भरलेल्या ट्रॅकरला गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात क्रूझर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अल्लाबक्सर मोहंमद अली यांचा मृत्यू झाला असून कासीम मुल्ला, मोहंमद हुसेन, शमिता हुंचल, हुसेनबीन बहिरोद्री,शाबाई हुंचल हे सर्वजण जखमी झाले आहेत. हे सर्व कोची कोटा विजापूर येथील रहिवाशी आहेत.

अपघाताची माहिती मिळताच डाळज येथील महामार्ग मदत केंद्रातील पोलीस व महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना पुढील उपचारासाठी भिगवण येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. आदल्या दिवशी रात्री झालेल्या अपघातात महिंद्रा पिकअप गाडीच्या चालकाने झोपेमध्ये आपली लेन सोडून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतात जाऊन पडली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले व ड्रायव्हर किरकोळ जखमी झाल्याने त्याला पुढील उपचरासाठी भिगवण येथे पाठवण्यात आले होते.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??