तुळशीराम घुसाळकर / हवेली
पुणे (हवेली) : कुख्यात मयत गुंड आप्पा लोंढे याचे नाव वापरून त्याच्या भाच्याने ४ एकर जमीन बळकाविण्याच्या हेतूने लोणी काळभोर येथील महिलेला जिवे ठार मारण्याची व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. तसेच लोंढे यांच्या भाच्याने महिलेचा विनयभंग करून ५७ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून फिर्याद दिली आहे. संजय नामदेव झुरुंगे (रा. मांजरी ता. हवेली, जि. पुणे) व त्याचा साथीदार संतोष बापु गायकवाड (रा. शिंदवणे ता. हवेली, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला या लोणी काळभोर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहतात. तिच्या आईच्या नावाने डाळींब (ता. दौड) ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर ३६४/१ मध्ये एकुण ७.५ एकर शेतजमीन आहे. आर्थिक अडचणीमुळे पिडीतेच्या कुटुंबीयांनी सन २०२४ मध्ये शेतजमीन विक्री करण्याचा निर्णय घेतला. पिडीतेच्या आईला लिहीता व वाचता येत नसल्याने त्यांनी येथील शेतजमीनीचे कुलमुखत्यारपत्राने पिडीतेच्या नावे करुन दिली. त्यानंतर पिडीतेचे कुटुंब शेतजमीन विक्रीसाठी ग्राहक शोधत होते. पिडीतेने त्यांच्या ओळखीचे डाळींब येथील तलाठी अभिमन्यु जाधव यांना समक्ष भेटुन शेतजमीन विकायची आहे. कोणी खरेदी करण्यास इच्छुक असल्यास कळवावे. अशी विनंती केली. अभिमन्यु जाधव यांच्या ओळखीचे संजय झुरुंगे व संतोष गायकवाड हे शेतजमीन खरेदी करण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले.
त्यानंतर सर्वांची कवडीपाट टोलनाका येथील एका हॉटेलवर मिटिंग झाली. यावेळी प्रत्येकी १५ लाख रुपये प्रमाणे ४ एकर शेतजमीन विक्रीचा व्यवहार ६० लाख रुपये ठरला. यापैकी ४५ लाख रुपये हे खरेदी खताच्या दस्तामध्ये नमुद करावयाचे व उर्वरीत १५ लाख रोख स्वरुपात द्यायचे असा व्यवहार ठरला होता. ठरलेल्या व्यवहारानुसार केडगाव (ता. दौंड) येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखताचा दस्त झाला. खरेदी खताच्या वेळी संतोष गायकवाड यांनी पिडीतेला सोपानकाका सहकारी बँक सासवड या बँकेचे ४ चेक दिले होते. त्यापैकी एक चेक ३ लाखचा व दुसरा ४३ लाखाचा व उर्वरीत दोन चेक प्रत्येकी ७ लाख रुपये रक्कमेचे दिले होते. पिडीतेने चेक वटवीणेकरीता बँकेत टाकले मात्र सर्व चेक बाऊन्स झाले. फिर्यादी यांनी संतोष गायकवाड यांना संपर्क करून याबाबत माहिती दिली असता, संतोष गायकवाड म्हणाले, खात्यात रक्कम नसल्याने बाऊन्स झाले असतील, तुम्हाला पुन्हा दुसरे चेक देतो असे सांगितले व त्याप्रमाणे पिडीतेला चेक दिले. त्यातील केवळ ३ लाख रुपयांचा चेक वटला व इतर सर्व चेक बाऊन्स झाले.
पिडीतेने याबाबत विचारणा केली असता, आरोपींनी पिडीतेला चार दिवसांची मुदत मागितली. व कवडीपाट टोलनाक्यावर भेटण्यासाठी बोलावले. तेव्हा आरोपी म्हणाले, सध्या पैसे नाहित ती प्रॉपर्टी पुढे अन्य इसमास विकुन त्यातुन आलेल्या नफ्यातुन पैसे (मोबदला) देतो असे सांगितले. तेव्हा पिडीतेला या व्यवहाराला नकार देऊन खरेदी खत रद्द करून देण्याची मागणी केली. त्यावेळी आरोपींनी खरेदीखत रद्द करण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी पिडीतेचा विनयभंग करून मनात लज्जा उत्पन्न होईल. असे वर्तन केले. यावेळी संजय झुरुंगे याने या प्रकाराबाबत जर पोलीसांकडे तक्रार दिली तर बघ मी आप्पा लोंढे (कुख्यात गुंड) याचा भाचा आहे. संपूर्ण कुटुंबाला जीवे ठार मारण्याच्य व अ०ट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. अशी फिर्याद पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार संजय झुरुंगे व संतोष गायकवाड यांच्यावर विनयभंगासह विविध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा